सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला..

सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून सोशल मीडियावर सुरू झाला नवा वाद

सलमान खान, सुशांत सिंह राजपूत

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी (१४ जून) मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून नवीन वाद सुरू झाला आहे. करण जोहर, सलमान खान, आलिया भट्ट यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला जात आहे. मात्र या कठीण काळात सुशांतच्या कुटुंबीयांच्या व त्याच्या चाहत्यांच्या पाठीशी उभे राहा, अशी विनंती सलमानने त्याच्या चाहत्यांना केली आहे. शनिवारी रात्री उशिरा त्याने हे ट्विट केलंय.

‘मी माझ्या सर्व चाहत्यांना विनंती करतो की त्यांनी सुशांतच्या चाहत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. त्याच्या चाहत्यांनी वापरलेल्या भाषेचा किंवा शापाचा विचार करू नका, मात्र त्यामागील त्यांच्या भावनांना समजून घ्या. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, ती व्यक्ती गमावणे हे सर्वांत जास्त दु:खदायक असतं. त्यामुळे सुशांतच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या चाहत्यांना साथ द्या, त्यांच्या पाठीशी उभे राहा,’ असं ट्विट सलमानने केलंय.

सोशल मीडियावर सलमान खानचे चाहते व सुशांतचे चाहते यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आहे. बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून सुशांतचे चाहते सलमानविरोधात ट्विट, पोस्ट करत आहेत. त्याला सलमानचे चाहते सोशल मीडियावर उत्तर देत आहेत. सलमानने ट्विट करत चाहत्यांना ही विनंती केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Salman khan urges to his fans to stand with sushant singh rajput fans ssv

ताज्या बातम्या