मुंबईतील वांद्रे येथील बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा ‘मन्नत’ हा बंगला आहे. अनेक चाहते शाहरुखचा बंगला पाहण्यासाठी त्याच्या घराबाहेर गर्दी करतात. या बंगल्याची किंमत तब्बल २०० कोटींहून अधिक आहे. ऐकेकाळी हा बंगला विकत घेण्याची सलमान खानची देखील इच्छा होती. सलमानने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.
सलमानने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहरुखचा ‘मन्नत’ हा बंगला खरेदी करणार असल्याचे सांगितले. पण सलमानचे वडिल सलीम खान यांनी सलमानला बंगला खरेदी करण्याची परवानगी दिली नाही. ‘इतक्या मोठ्या घराचे काय करणार?’ असा प्रश्न सलीम यांनी सलमानला विचारला होता. त्यानंतर त्याने मन्नत खरेदी करण्याचा विचार बदलला.
शाहरुखच्या ‘मन्नत’ शेजारीच सलमनाचे गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घर आहे. संपूर्ण कुटुंबीयांसोबत भाईजान तेथे राहतो. शाहरुखचा मन्नत हा बंगला ६०० चौरस फुटामध्ये आहे. बंगल्यामध्ये बेडरूम, लिविंग एरिया, जीम, खासगी बार, लायब्ररी, मुलांसाठी प्लेरूम आहेत. त्याच्या संपूर्ण बंगल्याचे इंटेरिअर डिझाइन स्वत: गौरी खानने केले आहे. शाहरुखने बंगला विकत घेण्यापूर्वी तो ‘विला विएना’ नावाने ओळखला जायचा.