बॉलीवूड ‘खान’दानातील एक खान लवकरच मराठी चित्रपटात दिसणार आहे. मराठीत काम करण्याचा पहिला मान सलमानने पटकावला आहे. रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या ‘लई भारी’ या चित्रपटात सलमान काम करणार आहे.
रितेशच्या ‘मुंबई फिल्म कंपनी’ आणि ‘सिनेमा एन्टरटेन्मेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले आहे. सलमान या चित्रपटात ‘पाहुणा कलाकार’ म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सलमान खान काम करत असलेल्या ‘मेंटल’ आणि रितेश देशमुखच्या ‘लई भारी’चे चित्रीकरण हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये सुरू असताना या दोघांची तेथे भेट झाली. त्या वेळी त्यांच्यातील गप्पांमधून सलमानने ‘लई भारी’मध्ये ठरले. सलमान खान या चित्रपटात मराठी माणसाची भूमिका करत असून चित्रपटात त्याला काही मराठी संवादही आहेत.
‘बालक पालक’ या चित्रपटाच्या निर्मितीनंतर रितेश देशमुखचा हा दुसरा मराठी चित्रपट आहे. सलमानने ‘लई भारी’मध्ये काम करण्याची तयारी दाखविल्यानंतर रितेशने चित्रपटाचा दिग्दर्शक निशिकांत कामत याला सलमानसाठी या चित्रपटात खास दृश्य/प्रसंग टाकण्याची विनंती केली होती. या चित्रपटात रितेशचीही भूमिका आहे.
नसीरुद्दीन शाहने ‘देऊळ’मध्ये ‘पाहुणा कलाकार’ म्हणून हजेरी लावली होती. त्याच्यापाठोपाठ आता सलमान चित्रपटात पदार्पण करत आहे.
दरम्यान, रविवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ‘लई भारी’तील गाण्यांच्या ध्वनिफितीचे प्रकाशन करण्यात आले. चित्रपटाचे संगीत अजय-अतुल यांचे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jun 2014 रोजी प्रकाशित
सलमान खान मराठीत येतोय, ‘लई भारी’!
बॉलीवूड ‘खान’दानातील एक खान लवकरच मराठी चित्रपटात दिसणार आहे. मराठीत काम करण्याचा पहिला मान सलमानने पटकावला आहे.
First published on: 10-06-2014 at 06:35 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan working in marathi film lay bhari