‘बिग बॉस’च्या सातव्या पर्वातील पहिले एलिमिनेशन झाले. ‘बॉडिगार्ड’ चित्रपटातील अभिनेत्री हेजल कीच ही केवळ एका आठवड्यातच ‘बिग बॉस’मधून शनिवारी बाहेर पडली.
तीन महिन्यांसाठी ‘बिग बॉस’च्या घरात राहण्यासाठी आलेले १४ सेलिब्रिटी बाहेरच्या जगातील कोणत्याही व्यक्तीशी संवाद न साधता राहणार आहेत. हे स्पर्धक स्वर्ग आणि नर्क या दोन भागांमध्ये विभागले गेले आहेत. हेजल कीचला या शोमध्ये नर्कात इतर स्पर्धकांसोबत पाठवण्यात आले होते. त्यानंतर पहिल्याच आठवड्यात तिचे एलिमिनेशनसाठी नाव घेण्यात आले आणि शोमधून बाहेर पडली. मात्र, ‘बिग बॉस’ हा आपल्यासाठी एक चांगला अनुभव होता. येथे मी नवीन लोकांना भेटले आणि त्यांच्याशी मैत्री केली. ‘बिग बॉस’च्या घरात सकारात्मक दृष्टिकोन घेऊन राहणे गरजेचे आहे हे मला कळले, असे हेजल यावेळी म्हणाली.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Sep 2013 रोजी प्रकाशित
‘बिग बॉस’मधून हेजल कीच ची गच्छंती
बॉडिगार्ड' चित्रपटातील अभिनेत्री हेजल कीच ही केवळ एका आठवड्यातच 'बिग बॉस'मधून शनिवारी बाहेर पडली.

First published on: 22-09-2013 at 11:55 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khans bodygaurd actress hazel keech exits bigg boss house