नातेवाईकांशी आणि जगाशी जुळवून घेण्याचा बॉलीवूडच्या दबंग सलमान खानचा एक वेगळाच अंदाज आहे. काही कायदेशीर गोष्टींमध्ये अडकल्यानंतरही बॉलीवूडमध्ये आपली पकड तशीच कायम ठेवण्यास सलमानला कोण शक्ती देत असेल तर ते त्याचे कुटुंब आहे.
सलमान स्वतः देखील आपल्या कुटुंबियांना प्रेम आणि स्नेहभाव दाखविण्याची एकही संधी सोडत नाही. त्याची लहान बहिण अर्पिता हीचे उद्या लग्न आहे. तिच्या आयुष्यातील या महत्वाच्या दिवसाला अधिक संस्मरणीय बनविण्यासाठी सलमानने काहीच कसर मागे ठेवलेली नाही. देशातील नामांकित व्यक्ती या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. इतकेच नाही तर मिळालेल्या माहितीनुसार सलमान अर्पिताला ३ बीएचके टेरेस फ्लॅट भेट स्वरुपात देणार असल्याचे कळते. मुंबईतील कार्टर रोड येथे असलेल्या या फ्लॅटची किंमत १६ कोटी इतकी आहे. सलमान आपल्या कुटुंबियांसमवेत राहत असलेल्या गॅलक्सी अपार्टमेन्टपासून पाच मिनिटांच्या अंतरावर हा फ्लॅट आहे. तसेच, राजेश खन्ना यांचा आशिर्वाद बंगलाही या फ्लॅटपासून जवळपास आहे.
अर्पिताच्या लग्नासाठी ठरवण्यात आलेल्या फलक्नुमा पॅलेसचे दिवसाचे भाडे एक ते दोन कोटीच्या घरात असून हे पॅलेस पाच दिवसांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. सलमानच्या बहिणीच्या लग्नाचा खर्च पाहता बॉलिवूडमधीले हे एक भव्य लग्न ठरणार आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khans wedding gift to arpita a terrace flat worth rs 16 cr
First published on: 18-11-2014 at 10:03 IST