दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रोफेशनल लाइफ सोबतच पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच समांथाने पती नागा चैतन्यला घटस्फोट दिला. पण त्यांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला या मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यानंतर समांथा मैत्रीणीसोबत फिरायला गेली होती. तिकडून आल्यावर समांथाने एक्स सासरे नागार्जुनची भेट घेतली.

समांथा नागार्जुनच्या हैदराबाद येथील अन्नपूर्णा स्टूडिओमध्ये जाऊन भेट घेतली. पण घटस्फोटानंतर समांथाने नागार्जुनची भेट का घेतली? असा प्रश्न पडला सर्वांनाच पडला. अनेकांनी समांथा आणि नागार्जुनमध्ये चांगले नाते असल्यामुळे भेट घेतली असल्याचे म्हटले तर काहींनी समांथा नागार्जुनच्या आगामी चित्रपटामध्ये काम करणार असल्यामुळे भेट घेतल्याचे म्हटले आहे.
आणखी वाचा : कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नावर सलीम खान यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

समांथा आणि नागार्जुनच्या भेटीचे खरे कारण म्हणजे तिचा आगामी तेलुगू चित्रपट ‘शकुंतलम.’ या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेच्या डबिंगसाठी ती अन्नपूर्णा स्टूडिओमध्ये गेल्याचे समोर आले आहे. तेथे ती नागार्जुनला भेटली असल्याचे म्हटले जात आहे.

समांथा लवकरच तेलुगू चित्रपट शकुंतलम आणि तमिळ चित्रपट काठू वकालु रेंदु कधालमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच समांथा रुथ प्रभू सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. तसेच ती राज एण्ड डीके यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. एका वेब सीरिजचे समांथा चित्रीकरण सुरु करणार असल्याचे म्हटले जाते.

२००९ मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर समांथा व नागा चैतन्यची पहिली भेट झाली. त्यावेळी नागा चैतन्य कमल हासन यांची मुलगी श्रुती हसनला डेट करत होता. तर दुसरीकडे समांथा व ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ रिलेशनशीपमध्ये होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्यमध्ये चांगलीच मैत्री झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१५ मध्ये ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा हे दोघं पुन्हा भेटले तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं. ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या जवळपास ४ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे.