आर्यन खान क्रुझ ड्रग्स प्रकरणी एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे सीबीआयच्या जाळ्यात अडकले आहेत. रविवारी आणि सोमवारी त्यांची सलग दोन दिवस चौकशी झाली. एकीकडे समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढत असताना त्यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने कोणाचंही नाव न घेता सद्यस्थितीवर उपरोधिक टोला लगावला आहे.

क्रांती रेडकर सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. बऱ्याच विषयांवर ती व्हिडीओद्वारे दिलखुलास गप्पा मारते. कधी विनोदी तर कधी उपरोधिक व्हिडीओ बनवून ती चाहत्यांसोबत संवाद साधत असते. गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे यांच्यावर चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने ती शांत झाली होती. परंतु, तरीही तिने आता एक उपरोधिक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने चांगुलपणावर विश्वास असल्याचं म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर या व्हिडीओमध्ये तिच्या आजीने तिला सांगितलेली एक गोष्टही सांगितली आहे.

dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

क्रांती रेडकर व्हिडीओमध्ये म्हणते की, “मी लहान होते तेव्हा माझ्या आजीने एक गोष्ट सांगितली होती. कलियुगातील गोष्ट. कलियुगात खोटं आहे, दिखावा आहे, छळ, कपट आहे. ती म्हणायची इथं लोक चांगुलपणाला टिकू देत नाही. जे लोक चांगलं काम करतात त्यांना दाबणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण जेव्हा चांगली कामं करणाऱ्या लोकांना दाबून दाबून, त्रास देऊन त्यांना जेव्हा तोललं जाईल तेव्हा पापाचा घडा भरत जाईल. आणि ज्या दिवशी हे वाईट लोक पापाचा घडा भरतील तेव्हा शिव भगवानला पृथ्वीवर यावं लागेल आणि ते प्रलय करतील.”

हेही वाचा >> आपल्यासह कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी, समीर वानखेडे यांचे मुंबई पोलिसांना पत्र

ती पुढे म्हणते की, “भगवान शिव प्रलय करणारच होते, तेवढ्यात श्रीराम येतात आणि म्हणतात भगवान शिव तुम्ही येथे प्रलय करू नका कारण तुम्ही प्रलय केलात तर ही जी चांगली लोकं राहिली आहेत, ज्यांच्या चांगुलपणामुळे जग चालतंय तेही संपून जाईल. आणि चांगुलपणा पराभूत होईल. मग भगवान शिव म्हणतात की प्रलयचा प्लान कॅन्सल.”

ही गोष्ट सांगून झाल्यावर क्रांती रेडकरने गोष्टीतील तात्पर्यही सांगितलं आहे. ती म्हणते की, “म्हणायचा उद्देश एवढाच आहे की, ही जी दुनिया चालतेय ती चांगुलपणावर चालेतय. खूप कमी लोक आहे जे हे जग चालवाहेत. आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला त्यांना साथ द्यायची आहे. मी चांगुलपणासोबत चालणार आहे. तुम्हीही चालणार आहात का? विचार करा.”

समीर वानखेडे यांना सीबीआयकडून चौकशीचे आदेश आले होते तेव्हाही क्रांती रेडकरने प्रतिक्रिया दिली होती. “आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, आम्ही कायद्याच्या मार्गाने लढत राहू”, असं क्रांती रेडकर म्हणाली होती. त्यानंतर तिने आता ही पोस्ट शेअर केल्याने तिने तिचा निश्चय दृढ केल्याचं नेटिझन्सचं म्हणणं आहे.

उद्या पुन्हा चौकशी

समीर वानखेडे यांच्याकडे ‘एनसीबी’च्या मुंबई विभागीय संचालकपदाची जबाबदारी असताना त्यांच्या पथकाने ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर छापा टाकला होता. त्या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाप्रकरणी ‘एनसीबी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. त्या आधारे सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना तात्पुरता दिलासा देत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. वानखेडे यांची सीबीआयकडून दोन दिवस चौकशी करण्यात आली असून त्यांना पुन्हा चौकशीसाठी २४ मे रोजी बोलवण्यात आले आहे.