मराठी चित्रपट खूप वेगळ्या वळणावर आहे, त्यात काही नवे प्रयोग होत आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटाची प्रतिमा उंचावत आहे. असे फक्त म्हणून उपयोग नाही. तर जेव्हा तसे घडते आणि रसिकांचा त्याला प्रतिसाद मिळतो तेव्हा त्याचे विशेष कौतुक करायला हवे. समृध्दी पोरे दिग्दर्शित ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रियल हिरो’ या चित्रपटाबाबत तसे घडत असल्याचे दिसते. चित्रपटाचा विषय अत्यंत अवघड एखाद्या कुटुंबाच्या वेगळ्या सामाजिक बांधिलकीवर चित्रपट निर्माण करता येवू शकतो अथवा चित्रपटाच्या माध्यमातून ते जगभर पोहचावे असे वाटणे हेच केवढे तरी कौतुकाचे आहे. अवघ्या अडिच तासामध्ये डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आपटे यांचे कार्य साकारणे, त्याची पटकथा रचताना तो माहितीपट होवू न देणे, ही कसरत करताना नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्याकडून व्यक्तिरेखा साकारून घेणे. केवढा मोठा प्रवास होता. त्यातून समृध्दी पोरे बरेच काही शिकली आणि त्या शिकण्यातून ती बदललीदेखील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपटाला फर्स्ट डे फर्स्ट शो पासूनच सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जुहू, अंधेरी, कांदिवली, बोरिवली अशा ठिकाणच्या मल्टीप्लेक्समध्ये खेळ हाऊसफुल्ल झाल्याची खबर आहे. कोणत्याही निर्माती-दिग्दर्शकाला प्रचंड प्रमाणावर सुखावणारा असाच हा योग आहे. समृध्दीने चित्रपटावरील काही उलटसुलट प्रतिक्रियांपेक्षा यशाचा आनंद घ्यावा ना? त्यात कामाचे चिज झाल्याचे वाटते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samruddhi porey
First published on: 15-10-2014 at 01:39 IST