scorecardresearch

सलमानच्या त्या ‘अनकम्फर्टेबल’ गळाभेटीवर सनाचं सडेतोड उत्तर

‘गळाभेट घेण्याची त्याची तशी पद्धतच असावी’

salman khan
सलमान खान

‘बिग झी एण्टरटेंमेन्ट’ पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटदरम्यान जे घडलं त्याने सर्वांचंच लक्ष वेधलं गेलं. रेड कार्पेटवर ‘बिग बॉस’च्या दहाव्या सिझनची स्पर्धक सना खानची सलमान खानने संकोचाने गळाभेट घेतल्याचा व्हिडिओ अल्पावधीतच व्हायरल झाला होता. सलमान गळाभेटीसाठी अक्षरश: लाजत सनाच्या जवळ गेला आणि बंद मूठ ठेऊन संकोचाने त्याने तिला मिठी मारली. सनाने घातलेल्या बॅकलेस ड्रेसचा विचार करूनच सलमानने अशी गळाभेटी घेतल्याचं म्हटलं जात होतं. यावर अनेकांनी कमेंट्स केल्या, आपली मतं मांडली. यानंतर आता सना खानने सर्वांनाच प्रत्युत्तर दिलंय.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सना म्हणाली की, ‘एक साधारण गळाभेटीवर सुद्धा इतकं ट्रोल होऊ शकतं यावर माझा विश्वास बसत नाहीये. सलमानने बंद मुठींनी गळाभेट घेतल्याने सर्वत्र याची चर्चा होतेय आणि काही मूर्ख लोक याला संकोचाने मिठी मारली असं म्हणत आहेत. त्याला संकोच वाटावं असं काही करणारी मी कोण? एखाद्यावर अशा पद्धतीने टीका करणं आणि माझ्याबद्दल चुकीच्या बातम्या पसरवणं हे अयोग्य आहे. एखाद्याची तशी स्टाइलही असू शकते. कदाचित तो तशाचप्रकारे गळाभेट घेत असावा. मला माहित नाही. याबद्दल योग्य उत्तर तुम्हाला सलमानच देऊ शकतो. गेल्या २५ वर्षांपासून तो चित्रपटसृष्टीत आहे. त्यामुळे बॅकलेस ड्रेसमुळे त्याने असं केलं असावं असं मला वाटत नाही. यापेक्षाही फार काही त्याने पाहिलंय (हसत). लहान मुलांप्रमाणे याबद्दल चर्चा करून हा विषय वाढवू नका.’

https://www.instagram.com/p/BXNFee6hY6-/

वाचा : अमिताभ- आमिरनंही ‘ब्लू व्हेल गेम’संदर्भात व्यक्त केली चिंता

त्या घटनेला माध्यमांनी विनाकारण मोठं केल्याचं मत सना खानने व्यक्त केलं. तर सनाच्या बॅकलेस ड्रेसचा विचार करुनच सलमान सावधानतेने वागला असावा असा तर्क अनेकांनी लावला होता. आता याबद्दल सलमान काय उत्तर देतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-08-2017 at 16:37 IST