‘आपकी तो मौत है भाई’, व्हिडीओ शेअर करत सना म्हणाली

जाणून घ्या सना का म्हणते असं..

अभिनेत्री सना खान लग्नानंतर पती मुफ्ती अनससोबत फिरायला कश्मीरला गेली आहे. ती तेथील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकताच तिने शेअर केलेल्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘आपकी तो मौत है भाई’ असे बोलताना दिसत आहे.

सनाने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कश्मीरमधील थंडी विषयी बोलताना दिसते. ‘बाकी काही नसले तरी चालेल पण बॉस, हे नसणे म्हणजे तुमचे मरण निश्चीत आहे. इथे कडाक्याची थंडी आहे’ असे सना व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

सनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा बुरखा परिधान केला आहे. काही दिवसांपूर्वी इस्लामसाठी चित्रपटसृष्टी सोडत असल्याचे सनाने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले. तिच्या या निर्णयानंतर अनेकांना धक्का बसला.

पाहा फोटो >> ‘शौहर और बेगम’ चले, अभिनेत्री सना खानने शेअर केले हनिमूनचे फोटो

सनाने २० नोव्हेंबर रोजी गुजरातचे मौलाना मुफ्ती अनसशी निकाह केला. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सना खानने ‘बिग बॉस’च्या सहाव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. प्रसिद्ध कोरिओग्राफर मेल्विन लुईसची ती गर्लफ्रेंड होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्या दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर तिने मेल्विनवर अनेक आरोपसुद्धा केले होते. त्यानंतर तिने काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर इंस्ट्रीसोडत असल्याचे सांगितले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sana khan shared video from kashmir talks about winter avb

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन