करोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहून संपूर्ण देश हवालदिल झाला आहे. राज्यात दिवसेंदिवस करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये वाढत करत आता हा लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत केला आहे. या काळात सगळं काही बंद असल्यामुळे रोजंदारीवर काम करण्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागत आहे. मात्र या गरजूंच्या मदतीसाठी अनेक व्यावसायिक आणि सेलिब्रिटी आले आहेत. प्रत्येक जण त्यांना शक्य होईल त्यानुसार या मजुरांना आर्थिक मदतीसोबतच अन्नधान्याचीही मदत करत आहे. यात अभिनेता संजय दत्तनेदेखील १ हजार कुटुंबांच्या जेवणाची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे.
“संपूर्ण देशावर सध्या संकट ओढावलं आहे. त्यामुळे प्रत्येक जण त्याला शक्य होईल त्याप्रमाणे एकमेकांची मदत करत आहेत. मात्र ही मदत करण्यासाठी बाहेर न जाता शक्यतो घरात राहूनच तुम्ही इतरांची मदत कशी करु शकता याकडे लक्ष दिलं पाहिजे. मला शक्य होईल तितक्या लोकांना मदत करण्याचा मी प्रयत्न करतोय”, असं संजयने सांगितलं.
Staying fit is very important especially during this time. So eat well, stay healthy & keep exercising. #QuarantineWorkout #HealthyAtHome #WorkoutAtHome #StayHomeStaySafe pic.twitter.com/1wvKbvXVij
— Sanjay Dutt (@duttsanjay) April 2, 2020
‘इंडिया टीव्ही’नुसार, मुंबईमधील वांद्रे ते बोरीवली या उपनगरांमध्ये राहणाऱ्या जवळपास १ हजार गरजू कुटुंबाना जेवण पूरविण्याच निर्णय संजयने घेतला आहे. एका संस्थेच्या माध्यमातून तो या गरजू कुटुंबांना जेवण पूरवत आहे.
दरम्यान, आतापर्यंत अनेक कालाकारांनी गरजूंसाठी त्यांच्या मदतीचा हात पुढे केला आहे. दाक्षिणात्य कलाकारांपासून ते बॉलिवूड दिग्गज कलाकारांपर्यंत प्रत्येक जण त्यांना शक्य होईल त्याप्रमाणे मदत करत आहे.