प्रसिद्ध अभिनेता, लेखक संजय मोने तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर येणार आहेत. या मुलाखतीचं थेट प्रक्षेपण प्रेक्षकांना लोकसत्ताच्या फेसबुक पाहता यईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय मोने मराठीतील एक नामवंत अभिनेता म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर ‘टाइम बरा वाईट’, ‘पेइंग घोस्ट’, ‘मुंबई टाईम’ ‘क्लासमेट्स’, ‘अ रेनी डे’, ‘मातीच्या चुली’, ‘रिंगा रिंगा’ आणि ‘भो भो’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासह त्यांना एक उत्तम लेखक म्हणूनही ओळखले जाते. ‘सत्य सावित्री आणि सत्यवा, ‘संशय कल्लोळ’, ‘साडे माडे तीन’, ‘इट्स ब्रेकिंग न्युज’, ‘पक पक पकाक’ या चित्रपटांतील संवाद लिहिले आहेत. याशिवाय रत्नाकर मतकरी दिग्दर्शित ‘इन्वेस्टमेंट’ या पुरस्कार विजेत्या चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

या हरहुन्नरी कलावंताला थेट प्रश्न विचारण्याची संधी प्रेक्षकांनाही मिळणार आहे. बुधवारी २४ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून संजय मोने ‘LoksattaLive’ या फेसबुक पेजवर लाइव्ह असतील.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay mone interview on loksatta digital adda mppg
First published on: 23-06-2020 at 14:43 IST