सारावर का आली तोंड लपवण्याची वेळ?

दुपट्ट्याने चेहरा झाकून घाईघाईने सारा कारमध्ये बसली.

sara ali khan
सारा अली खान

वांद्रे येथील एका सलॉनमध्ये सैफ अली खानची मुलगी साराला पाहिलं गेलं. तिच्यासोबत तिची मैत्रिण रिया चक्रवर्तीसुद्धा होती. मात्र सलॉनमधून बाहेर पडताना साराने आपलं तोंड लपवलं होतं. दुपट्ट्याने चेहरा झाकून घाईघाईने ती कारमध्ये बसली. कॅमेरांपासून कधीही दूर न पळणारी सारा आता माध्यमांपासून तोंड का लपवत होती, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्टार कीड सारा अली खान चर्चेत आली आहे.

साराने तोंड लपवल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. कदाचित तिच्या आगामी ‘केदारनाथ’ चित्रपटात वेगळ्या लूकमध्ये ती दिसेल आणि हाच लूक लपवण्याचा प्रयत्न ती करत होती, अशीही चर्चा होत आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच साराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये, कार्यक्रमांमध्ये साराला अनेकदा पाहिलं गेलं. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरसोबतच साराच्याही बॉलिवूड पदार्पणाबाबत जोरदार चर्चा होत आहे. पण, करिअर म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याच्या तिच्या या निर्णयावर सैफ अली खानने मात्र नाराजी व्यक्त केली होती. करिअर म्हणून चित्रपटसृष्टीची निवड करण्याऐवजी तिने स्थिरस्थावर पर्यायाची निवड करावी अशी सैफची अपेक्षा आहे.

sara-ali-khan-1

sara-ali-khan-2

वाचा : पुणेकरांनी तब्बूच्या चित्रपटाचे शूटिंग पाडले बंद

सारा लवकरच ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटातून सारा अखेर तिच्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. काही दिवसांपूर्वीच सारा, तिची आई अमृता सिंग, अभिषेक कपूर आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत हे एकत्र दिसले होते. अभिषेक कपूर आणि सारा उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात दर्शनासाठीही गेले होते.

sara-ali-khan

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी हर्षवर्धन कपूर, सुशांत सिंग राजपूतसुद्धा उपस्थित होते. रिया आणि सारा जिवलग मैत्रिणी असून अनेकदा दोघींना एकत्र पाहिलं गेलं. ‘केदारनाथ’ चित्रपटातील साराच्या भूमिकेबद्दल आणि लूकबद्दल आता प्रेक्षकांमध्ये अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sara ali khan tried hid her face with a dupatta when she left the salon with her friend rhea chakraborty