केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज त्यांचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी भाजपा आणि सरकारमधील त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांनी अमित शाह यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“अमित शाहजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी अमित भाईसोबत अनेक वर्षे काम केले आहे. पक्ष आणि सरकार बळकट करण्यात त्यांचे उत्कृष्ट योगदान पाहिले आहे. अशा उत्साहाने त्यांनी देशाची सेवा केली असती. संपर्कात रहा. प्रार्थना करा. त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो,” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

गृहमंत्री अमित शाह यांना राजकीय नेतेमंडळीसह काही कलाकारांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खाननेही अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शुभेच्छा,” असे सारा अली खानने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मात्र साराने दिलेल्या या शुभेच्छांवरुन तिला ट्रोल करण्यात येत आहे. एनसीबीने आर्यन खान प्रकरणानंतर पुन्हा आपली पावले बॉलीवूडकडे वळवल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे साराने अमित शाह यांना शुभेच्छा दिल्या आहेत असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

साराचे नाव छापा टाकणाऱ्यांच्या यादीतून वगळा

एनसीबीला विनंती करत आहे की पुढील कारवाई टाळा.

NCB झिंदाबाद गृहमंत्र्यांना कोन शुभेच्छा देत होते का?

तुम्ही क्रोनोलॉजी समजून घ्या

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिचे नाव ड्रग्स कनेक्शनप्रकरणी समोर आले होते. सारा ही सुशांतच्या फॉर्महाऊसवरील अनेक पार्ट्यांमध्ये सहभागी असायची. यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा वापर केला जात होता. याप्रकरणी साराची चौकशी केली असता, तिने ड्रग्ज घेतल्याला स्पष्टपणे नकार दिला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sara ali khan trolls happy birthday to home minister amit shah abn
First published on: 22-10-2021 at 17:29 IST