छोट्या पडद्यावरची अभिनेत्री सारा खान लवकरच ‘मिड समर मिड नाईट मुंबई’ (एम ३)  या बॉलिवूडपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिने रेकॉर्डब्रेक ‘सिरियल किसिंग’ दृष्ये साकारल्याने ती चर्चेत आहे. या आधी मल्लिका शेरावतने हा कारनामा करून दाखवला होता. सारा खानने या कारनाम्यात मल्लिकालाही मागे सोडले आहे. तिने इतकी चुंबन दृष्ये दिली आहेत की त्याची मोजदाद करणेसुद्धा कठीण होऊन बसले आहे. ‘मिड समर मिड नाईट मुंबई’ (एम ३) हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर थीमवर आधारित असून, व्रज भूषण हे या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक आहेत. चित्रीकरणादरम्यान सारा आणि चित्रपटाचा हिरो पारस यांच्यात किती चुंबन दृष्ये चित्रीत करण्यात आली याची आपण गणना न करू शकल्याचे व्रज भूषण यांचे म्हणणे आहे.

पाहा फोटो अल्बम : सारा खान आणि पारस छाबडाचा ‘मिड समर मिड नाईट मुंबई’ (एम ३)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विषयी बोलताना ते म्हणाले, कथानकाच्या मागणीनुसार चित्रपटात सदर दृष्ये चित्रीत करण्यात आली आहेत. साराने ही दृष्ये अतिशय सहजपणे केली, कारण चित्रपटातील हिरो पारस छाबडा हा तिचा बॉयफ्रेण्ड आहे. दोघांनी ही दृष्ये एन्जॉय केली आणि आमचे काम पण झाले. हा चित्रपट वेगळ्या धाटणीतला असून, यातील रहस्य आणि चित्तथरारक दृष्ये प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवतील, असे दिग्दर्शक व्रज भूषण यांचे म्हणणे आहे. गुडनेट प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत असलेला हा चित्रपट होळीनंतर देशात प्रदर्शित होत आहे.