दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे (Pravin tarde) सध्या त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. प्रवीण तरडे यांचा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट सध्या बॉक्सऑफिसवर तुफान चालत आहे. तर दुसरीकडे ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. स्वराज्याचे धाकले धनी संभाजी राजे आणि त्यांच्या डोक्यावरचं छत्र अन पाठीवरची ढाल बनून राहणारे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव यांच्या शौर्याला सलाम करणारा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजतोय. काल म्हणजेच २७ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून कर्नाटकात थिएटर बाहेर पोस्टरला दुग्धाभिषेक घालण्यात आला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दुग्धाभिषेक घालण्यात आल्याचा हा व्हिडीओ सरसेनापती हंबीररावच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कर्नाटकातील अंकली परिसरातील आहे. या व्हिडीओत एक चाहता थिएटर बाहेर असलेल्या चित्रपटाच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘चला इतिहासाचे साक्षीदार होउया .. अंकली कर्नाटक मधील प्रेक्षकांचे प्रेम’, असे कॅप्शन देण्यात आले आहे.

आणखी वाचा : जेव्हा माधुरी, सलमान आणि शाहरुख एकत्र येतात…, फोटो व्हायरल

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रविण तरडे यांनी केले आहे. चित्रपटात गश्मीर महाजनी, स्नेहल तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, प्रतिक मोहिते, राकेश बापट, देवेंद्र गायकवाड, आर्या रमेश परदेशी, अंगद म्हसकर, कै. अमोल धावडे हे कलाकारा महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.