सावनी रवींद्रची अनप्लग्ड गाणी

अनप्लग्ड गाणे वेगळा बाज देऊन प्रदíशत केले जाते किंवा एखाददुसरंच वाद्य वाजवून गायले जाते.

सावनीने अनप्लग्डच्या पहिल्या पर्वात १५ गाणी गायली होती.

‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील ‘तू मला मी तुला’ हे प्रेमगीत गाणारी सावनी रवींद्र हिची अनप्लग्ड गाणी आता रसिक श्रोत्यांना ऐकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अनप्लग्ड गाण्यांना मुखत्वे गिटार किंवा कीबोर्डने म्युझिक दिले जाते. अनप्लग्ड म्हणजे तांत्रिक प्रक्रिया न केलेले गाणे असून सध्या ही अनप्लग्ड गाणी मूळ गाण्यांपेक्षा जास्त लोकप्रिय होत आहेत.
अनप्लग्ड गाणे वेगळा बाज देऊन प्रदíशत केले जाते किंवा एखाददुसरंच वाद्य वाजवून गायले जाते. सावनीने अनप्लग्डच्या पहिल्या पर्वात १५ गाणी गायली होती. त्यात हिंदी आणि मराठी या गाण्यांचा समावेश होता. यात ‘तू मला मी तुला’ या गाण्यासह ‘बगळ्याची माळ फुले’, ‘चांदण्या रात्रीतले स्वप्न तू विसरून जा’, ‘जाने तू या जाने ना’, ‘यूं हसरतों के दाग’, ए. आर. रहमान यांचं ‘ड्रीम्स ऑन फायर’ आदी गाण्यांचा समावेश होता.
येत्या ६ डिसेंबरपासून सावनीचा ‘सावनी अनप्लग्ड पर्व २’च्या माध्यमातून ही गाणी रसिकांना ऐकता येणार आहेत. नवोदित संगीतकार रिषभ शाह याने ही गाणी संगीतबद्ध केली असून देवेश कामत आणि अजिंक्य कुलकर्णी या नवोदित दिग्दर्शकांनी दिग्दíशत केली आहेत. ही सर्व अनप्लग्ड गाणी इंटरनेटवर ‘ओन्ली मराठी एन्टरटेण्टमेंट’ (ONLY MARATHI ENTERTAINMENT) या यूटय़ूब चॅनेलवर ऐकता येणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sawani ravindra unplugged songs

ताज्या बातम्या