माजी विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही ‘अनएड्स’ची (UNAIDS) सदिच्छा दूत आहे. आज जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने मुलांना शाळेत लैंगिक शिक्षण देणे महत्त्वाचे असल्याचे मत ऐश्वर्याने बोलून दाखविले.
जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला ऐश्वर्या उपस्थित होती. लैंगिक शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे. आपण सर्वांनी त्याचे शिक्षण घेतले आहे. शाळेत असतानाचं मुलांना यासंबंधी शिक्षण देणे फार गजजेचे आहे. शहरांमधील बहुतेक शाळांमध्ये याबाबत मुलांना ज्ञान दिले जाते. पण, जर देशभरातील सर्व शाळांमध्ये लैंगिक शिक्षण अनिवार्य केले गेले तर मला नक्कीच आनंद होईल, असे ऐश्वर्या म्हणाली. ‘अनएड्स’मुळे ऐश्वर्याला जगभरातील महिलांपर्यंत पोहचण्याची संधी मिळाली. त्यामुळे ‘अनएड्स’ची सदिच्छा दूत म्हणून पार पाडत असलेल्या आपल्या भूमिकेबाबत ऐश्वर्याने समाधान व्यक्त केले.