बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना एक उत्तम अभिनेत्री होऊ शकते, असे मत वर्तविले आहे. ६६ वर्षीय आझमी यांनी ट्विटरवरून सुहाना खानची प्रशंसा केली.
वाचा : नकटूसाठी स्थळ शोधणारा पांडू अर्थात प्रल्हाद लग्न बंधनात अडकला
‘माझे शब्द लक्षात ठेव सुहाना खान ही पुढे जाऊन एक चांगली अभिनेत्री होणार. मी तिचे काही व्हिडिओ बघितले आहेत. तिने खूप छान अभिनय केलाय,’ असे शबाना यांनी ट्विट केले. या ट्विटला अभिमानाने ऊर भरून आलेल्या बादशहा शाहरुखनेही उत्तर दिले. त्याने लिहिलंय की, ‘तुम्ही खरंच खूप चांगल्या आहात. तुमच्या या वक्तव्यामुळे नक्कीच छोटीला प्रेरणा मिळेल. धन्यवाद.’ तुम्हाला माहितीये का, बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट म्हणून नावाजल्या जाणाऱ्या आमिर खानचीदेखील शबाना यांनी एकेकाळी प्रशंसा केली होती. आमिर बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी त्याने एक लघुपट केला होता. हा लघुपट फार कमी जणांनी पाहिला होता. हा लघुपट पाहिलेल्या मोजक्या व्यक्तींपैकी एक म्हणजे शबाना आझमी. त्यावेळी तो एक चांगला अभिनेता होणार, असे शबाना यांनी म्हटले होते. एकंदरीतच शबाना यांचा भावी कलाकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन यातून दिसून येतो. त्यामुळे सुहानादेखील बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री होण्याची चिन्हं आता दिसून येत आहेत.
वाचा : ‘त्या’च्यावरील प्रेमाने शाहरुख भारावला….
How sweet are you to say that. & of course when u say it then it’s big encouragement for the little one. Thanks. https://t.co/hfFW8hx3o2
— Shah Rukh Khan (@iamsrk) May 28, 2017
सुहानाने तिच्या शाळेत झालेल्या नाटकात सहभाग घेतला होता. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओतून तिच्या अभिनय कौशल्याची झलक सर्वांनाच दिसलेली. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत असलेल्या सुहानाच्या अभिनयाची खूप प्रशंसाही झाली होती. सुहानाला अभिनय क्षेत्रात रस असल्याचे शाहरुखने अनेकदा मुलाखती आणि चॅट शोमध्ये सांगितले आहे.
