छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ससुराल सिमर का’, ‘पुनर्विवाह’, ‘एक वीर की अरदास वीरा’ आणि ‘मधुबाला’मध्ये काम करणारी अभिनेत्री शगुफ्ता अली या सध्या चर्चेत आहे. या चर्चा एका मुलाखतीमध्ये शगुफ्ता यांनी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितल्यामुळे सुरु झाल्या आहेत. सध्या शगुफ्ता यांच्याकडे डोळ्यांच्या उपचारासाठी देखील पैसे नाहीत. त्यांची आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकार त्यांच्या मदतीला धावून आले आहेत.
‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेत काम करणाऱ्या नीना गुप्ता, अभिनेता सुमित राघवन आणि ‘सावधान इंडिया’ या मालिकेतील अभिनेता सुशांत सिंह यांनी शगुफ्ता यांना मदत केल्याचे म्हटले जात आहे. तसेच बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट निर्माता रोहित शेट्टीनेदेखील मदतीचा हात पुढे केला आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा : पुण्याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा दिलीप कुमार दोन मिनिटं शांत बसले अन्….
पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, अशोक पंडित यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘शगुफ्ता यांच्या आर्थिक अडचणीविषयी माहिती मिळताच मी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांची कशा प्रकारे मदत करता येईल हे विचारले. त्यांचे संपूर्ण बोलणे ऐकल्यानंतर मी रोहित शेट्टीशी बोललो. त्यानंतर त्याने शगुफ्ता यांना मदत करण्याचे निर्णय घेतला’ असे अशोक पंडित म्हणाले.
View this post on Instagram
पुढे ते म्हणाले, ‘रोहित शेट्टीने शगुफ्ता यांना आर्थिक मदत केली आहे. आम्ही सर्वजण त्यांचे आभार मानतो. इंडस्ट्रीमधील आणखी काही लोकांकडे मदतीसाठी विनंती केली आहे. रोहित शेट्टीने मदत केल्यानंतर शगुफ्ता यांनी त्याचे आभार मानले आहेत. त्या म्हणाला, मी स्वत:ला भाग्यवान समजेन की रोहितने माझी मदत केली.’
शगुफ्ता गेल्या ३६ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी जवळपास १५ चित्रपट आणि २० मालिकांमध्ये काम केले आहे. आज त्याच शगुफ्ता आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. एवढंच नाही तर त्यात भर म्हणजे त्या आजारी आहेत. त्यांनी ‘मेहंदी’, ‘हीरो नंबर १’ आणि ‘अजुबा’ सारख्या चित्रपटात काम केले आहे.