शाहरुख खानला बघताच आर्यन रडू लागला; म्हणाला, “मला जेल…”

आज शाहरुख खानने आर्यनची भेट घेतली. 

आर्यन खानचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळला. आर्यनसह अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा यांची जामीन याचिकाही फेटाळण्यात आली आहे. आता मंगळवार २६ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान आर्यन सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. आज शाहरुख खानने आर्यनची भेट घेतली. 

अमली पदार्थाच्या प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानला एक दिवस तुरुंगात घालवणे कठीण जात आहे. १४ दिवसांनंतर गुरुवारी सकाळी शाहरुख खान आर्यनला भेटला. वडील आणि मुलाची १५ मिनिटांची ही भेट अतिशय भावनिक होती. आर्यन खान त्याच्या वडिलांना पाहून रडल्याची माहिती सूत्राच्या हवाल्याने आज तकने दिली आहे.

आर्थर रोड कारागृहातील सूत्रांनी शाहरुख खान आणि आर्यन खानच्या भेटीचा आतील तपशील दिला आहे. त्यानुसार, दोघांची ही भेट अतिशय भावनिक होती. शाहरुख खान जेव्हा आपल्या मुलाला भेटत होता, त्यावेळी २ जेलरक्षक तेथे उपस्थित होते. या दोघांनी इंटरकॉमद्वारे एकमेकांशी संवाद साधला. दोघांच्या मध्ये ग्रील आणि काचेची भिंत होती. शाहरुख खानने आर्यनला विचारले की तो चांगले खात आहे का? ज्याला आर्यनने नकार दिला.

आर्यन शाहरुख खानला सांगितले की, मला जेलमधलं जेवण आवडतं नाही. त्यानंतर शाहरुख खानने तेथे उपस्थित असलेल्या तुरुंग अधिकाऱ्यांना विचारले की ते आर्यनला घरचे जेवण देऊ शकतो का? यावर तुरुंग अधिकाऱ्यांनी  शाहरुख  खानला सांगितले की त्याला घरच्या जेवण्यासाठी कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल. या भेटीदरम्यान शाहरुख खानने आपल्या मुलाला धैर्य देण्याचा प्रयत्न केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shah rukh khan arthur road jail to meet his son aryan started crying when he saw father srk