‘हॅपी न्यू ईयर’ची प्रदर्शनापूर्वीच २०० कोटींची कमाई

बॉलिवूडचा सुपरकिंग शाहरूख खानच्या ”चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवले होते. मात्र, शाहरुखचा आगामी चित्रपट ‘हॅपी न्यू ईयर’ने चित्रपटाच्या कमाईबाबतीत ”चेन्नई एक्सप्रेस’वर कडी साधली आहे.

बॉलिवूडचा सुपरकिंग शाहरूख खानच्या ”चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवले होते. मात्र, शाहरुखचा आगामी चित्रपट ‘हॅपी न्यू ईयर’ने चित्रपटाच्या कमाईबाबतीत ”चेन्नई एक्सप्रेस’वर कडी साधली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच २०० कोटींची कमाई करत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. फरहान खान दिग्दर्शित या सिनेमामध्ये शाहरूखसह दीपिका पदुकोण, बोमन इराणी, सोनु सूद यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. ‘हॅपी न्यू ईयर’ चित्रपटाच्या जगभरातील सिनेमागृहांमधील प्रसारणहक्कांच्या माध्यमातून यशराज बॅनरला तब्बल १२५ कोटींची कमाई झाली आहे. तसेच झी नेटवर्कने या चित्रपटाच्या सॅटेलाईट हक्कांसाठी ६५ कोटी रूपये मोजले आहेत. या चित्रपटातील संगीताचे मालकीहक्क टी-सिरीजने १२ कोटी रूपये देऊन विकत घेतले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shah rukh khan deepika padukones happy new year earns rs 200 crores before release

ताज्या बातम्या