बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याच्या आरोपावरून एनसीबीने अटक केली. त्यानंतर मुंबई न्यायलयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांसह इतरांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की एनसीबीला तपासासाठी पुरेपूर संधी आणि वेळ देण्यात आली आहे, त्यामुळे आता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले जात आहे. सुनावणी दरम्यान, आर्यनला पाहून शाहरुख खानच्या मॅनेजरला रडू कोसळले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आजतक’ने दिलेल्या वृत्तानुसार, कोर्टात सुनावणीदरम्यान पूजा दादलानी हजर होत्या. आर्यनला पाहून त्यांना रडू कोसळले. यापूर्वी दोन दिवस आधी पूजा दादलानी आर्यन खानला भेटायला एनसीबी ऑफिसमध्ये गेल्या होत्या. पण त्यावेळी त्यांची आणि आर्यनची भेट झाली की नाही या बाबात कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

PHOTOS: आर्यन खानला NCB ने ज्या क्रूझवरुन ताब्यात घेतलं ती क्रूझ आतून कशी दिसते पाहिलीत का?

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि सात इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आर्यन खानला कोठडी दिल्यानंतर आर्यन खानसह आठही जणांकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. या आठही जणांच्या जामीन अर्जावर आज, शुक्रवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यन खानला जामीन मिळणार की, कोठडीत वाढ होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan manager pooja dadlani cried during court hearing of aryan khan drugs case avb
First published on: 08-10-2021 at 11:32 IST