‘बिग बॉस’च्या नव्या सिझनला लवकरच सुरुवात होणार आहे. यात सहभागी होणा-या अपेक्षित सेलिब्रेटींबाबतच्या चर्चेलाही उधाण आले आहे. आलोकनाथ, पूनम पांडे, यो यो हनी सिंग, लुलिया वेंतुर, शिवाजी साठम हे चेहरे बिग बॉसच्या नव्या सिझनमध्ये दिसण्याची शक्यता आहे. या वादात्मक रिअॅलिटी शोमध्ये कोण सहभागी होईल हे निदान सांगता तरी येतंय पण याचा सूत्रसंचालक कोण असणार यावर मात्र अद्याप प्रश्नचिन्ह आहे. गेल्या सिझनमधील स्पर्धकांच्या वागणूकीनंतर सलमानने पुढच्या सिझनचे सूत्रसंचालन करणार नसल्याचे सांगितले होते. मग सूत्रसंचालन करणार तरी कोण? तर याचे उत्तर स्वतः सलमाननेच दिले. शाहरुख खान बिग बॉसचे सूत्रसंचालन करण्यास योग्य असल्याचे त्याने म्हटले.
नुकताच सलमानच्या आगामी ‘किक’ चित्रपटातील डेव्हिल गाण्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी पत्रकार परिषदेत सलमान बोलत होता. सलमान म्हणाला, “बिग बॉसच्या आगामी सिझनचे मी सूत्रसंचालन करण्याची शक्यता आहे किंवा करणारदेखील नाही. पण, जर मी सूत्रसंचालन नाही केले तर माझ्या मते शाहरुख खान बिग बॉससाठी एक चांगला सूत्रसंचालक होऊ शकतो.” इतकेच नाही तर सलमानने शाहरुखचे नाव आधीच सुलवल्याचेही सांगितले जात आहे. गेल्यावर्षीच्या इफ्तार पार्टीनंतर बॉलीवूडमध्ये वारे उलट्या दिशेने वाहू लागले आहेत. बॉलीवूडमधले चांगले मित्र कतरिनाच्या बर्थडे पार्टीत वैरी बनले. हे वैर तब्बल पाच वर्षे चालले. मात्र, गेल्या वर्षी बाबा सिद्दीकी यांनी दिलेल्या इफ्तार पार्टीत या दोघांचे मनोमिलन झाले. त्यानंतर यावर्षीही पुन्हा तेच चित्र पाहावयास मिळाले. आता सलमानने बिग बॉससाठी शाहरुखचे नाव सूचवून ही मैत्री पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan will be great host for bigg boss says salman khan
First published on: 14-07-2014 at 07:47 IST