शाहरुख खानचा रेकॉर्डब्रेक ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा केवळ भारतातच नाही तर अमेरिकेतही चांगली कमाई करत आहे. हा चित्रपट अमेरिकेतील लोकप्रियतेच्या यादीमध्यें प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात १३व्या स्थानावर पोहचला आहे. बॉक्स ऑफिसमोजोनुसार अमेरिकेच्या १९६ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या या चित्रपटाने सुरुवातीच्या चार दिवसांमध्ये २४,१६,५१३ डॉलरची  (१.४ कोटी) कमाई केली.
बॉक्स ऑफिसमोज अमेरिकेत प्रदर्शित होणा-या सर्व मोठ्या चित्रपटांची पाहणी करते. त्याच्यानुसार ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपट लोकप्रियतेच्या यादीमध्ये १३व्या स्थानावर आहे. या यादीत एलिशियम पहिल्या स्थानावर, वी आर मिलर्स दुस-या स्थानावर आणि प्लेन्स तिस-या स्थानावर आहे.