बॉलिवूड कलाकारांचे फॅन आणि त्यांचे किस्से कायमच गाजत असतात. हे फॅन्स आपल्या आवडत्या कलाकारासाठी काय करतील काही सांगता येत नाही. नुकतीच अशीच एक घटना पाहायला मिळाली. अभिनेता शाहरुख खान याचे चाहते असलेल्या एका जोडप्याने शाहरुखचे मुंबईतील घर ‘मन्नत’ गाठले. विशेष म्हणजे शाहरुख खान खूप आवडत असल्याने या जोडप्याने लग्नगाठ बांधल्यानंतर एखाद्या धर्मस्थळाला भेट देतो त्याप्रमाणे ते शाहरुखच्या घरी गेले. आता हे ऐकायला काहीसे हास्यास्पद वाटले असले तरी हे प्रत्यक्षात घडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवविवाहीत दाम्पत्य याठिकाणी गेल्यानंतर या मुलाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केले. तो म्हणतो, ‘लग्नगाठ बांधल्यानंतर मंदिरात जावे, आम्ही अगदी तसेच केले.’ या पोस्टमध्ये त्याने आपल्या बायकोसोबतचा फोटोही शेअर केला आहे. या पोस्टमध्ये या तरुणाने शाहरुख खानला टॅग करुन तु आम्हाला पाहिले आणि हात दाखवला हे आम्हाला माहित आहे. आमचा हा खास दिवस आणखी खास बनविल्याबद्दल या त्याने शाहरुखचे खूप आभारही मानले. विशेष म्हणजे आपल्या या फॅनला खूश करण्यासाठी शाहरुखनेही या मुलाच्या ट्विटला उत्तर देत त्याला देव तुमचं भलं करो (God Bless you) अशा शुभेच्छा दिल्या.

अशाप्रकारे शाहरुखने शुभेच्छा दिल्याने हे जोडपे तर खूश झालेच पण त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळीही खूश झाले. तरुणाच्या पोस्टनंतर अनेकांनी ट्विटर हँडलवर प्रतिक्रिया देत माझीही असेच कऱण्याची इच्छा होती किंवा आहे असे म्हटले. तर बऱ्याच जणांनी या जोडप्याला तुम्ही खूप लकी आहात असेही म्हटले आहे. थेट शाहरुखने तुम्हाला शुभेच्छा दिल्याने तुमचे सोबतचे आयुष्य नक्कीच चांगले जाईल अशा शुभेच्छा बऱ्याच जणांनी त्यांना दिल्या. सोशल मीडियावर या तरुणाच्या करामतीची, SRK ने त्याला दिलेल्या शुभेच्छांची जोरदार चर्चा रंगली आहे.

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khans good gesture for this couple who went to mannat on wedding day is winning hearts online
First published on: 16-12-2018 at 13:02 IST