बॉलीवू़ड बादशहा शाहरुख खानचा किती मोठा चाहतावर्ग आहे हे काही वेगळे सांगायला नको. पण त्याच्याहीपेक्षा त्याचा मुलगा आर्यन खान हा सव्वाशेर आहे, आपल्या वडिलांप्रमाणेच आर्यनही सोशल माध्यमांवर चांगलाच प्रसिद्ध आहे.
आर्यनने नुकताच शाळेच्या गणवेशातील एक फोटो इनस्टाग्रामवर शेअर केला आहे. आर्यन हा लंडन मध्ये ‘सेव्हेन ओक्स स्कूल’ मध्ये शिकत आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, मुलगी सुहाना खान, सैफअली खानचा मुलगा इब्राहिम खान, तसेच श्रीदेवीची मुलगी खुशी आणि जान्हवी कपूर ही सेलिब्रेटी मुले सोशल नेटवर्किंग साइटवर चांगलीच प्रसिद्घ आहे.
आपल्या आई-वडिलांप्रमाणेच त्यांच्या मुलांचेसुद्धा सोशल माध्यमांवर प्रचंड चाहते आहेत. ही मुले त्यांच्या मित्रमंडळींसोबतची आणि काही वैयक्तिक छायाचित्रे सोशल माध्यमांवर शेअर केरत असतात.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2016 रोजी प्रकाशित
बाप एक नंबरी बेटा दस नंबरी!
वडिलांप्रमाणेच आर्यनही सोशल माध्यमांवर चांगलाच प्रसिद्ध आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 02-02-2016 at 16:31 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khans son aryan shares a pic from school with his boy gang