scorecardresearch

अभिनेता शाहीर शेखच्या वडिलांचं निधन, करोनामुळे शरीरात पसरलं होतं इन्फेक्शन

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शाहीर शेखच्या वडिलांचं करोना इन्फेक्शनमुळे निधन झालं.

shaheer sheikh, shaheer sheikh father shahnawaz sheikh passes away, shaheer sheikh father , aly goni, shahnawaz sheikh, ruchikaa kapoor, kuch rang pyar ke aise bhi actor, Hindi TV Shows, Shaheer Sheikh's father died after covid infection, Shaheer Sheikh's father dies of Covid-19 infection, shaheer sheikh latest news, shaheer sheikh news in marathi, शहीर शेख, शाहनवाज शेख, शहीर शेख यांचे वडील शाहनवाज शेख, शाहनवाज शेख यांचे निधन, अली गोनी, रुचिका कपूर, कुछ रंग प्यार के ऐसे भी, मनोरंजन न्यूज
शाहीरनं काही दिवासांपूर्वीच ट्विटरवरून त्याच्या वडिलांना करोनामुळे गंभीर इन्फेक्शन झाल्याची माहिती दिली होती.

लोकप्रिय टीव्ही अभिनेता शाहीर शेखवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शाहीरचे वडिल शाहनवाझ शेख यांचं निधन झालं आहे. शाहीरनं काही दिवासांपूर्वीच ट्विटरवरून त्याच्या वडिलांना करोनामुळे गंभीर इन्फेक्शन झाल्याची माहिती दिली होती. त्यांची प्रकृती गंभीर होती त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी शाहीरनं त्याच्या वडिलांसाठी प्रार्थना करण्याची चाहत्यांना विनंती केली होती.

शाहीरच्या वडिलांचं बुधवारी रात्री निधन झालं. शाहीरचा जवळचा मित्र आणि अभिनेता अली गोनीनं ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. शाहीरला आपल्या ट्वीटमध्ये टॅग करत अलीनं लिहिलं, ‘अल्लाह तुझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती देवो’

अली गोनीच्या या ट्वीटनंतर शाहीरचे चाहते देखील शाहीरचं सांत्वन करताना दिसत आहेत. त्याच्या वडिलांसाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. दरम्यान १८ जानेवारीला रात्री शाहीरनं एक ट्वीट केलं होतं ज्यात त्यानं लिहिलं होतं, ‘माझे वडील व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांना करोनामुळे गंभीर इन्फेक्शन झालं आहे. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा.’

शाहीर शेखच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याने ‘महाभारत’ या टीव्ही मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या मालिकेत त्यानं अर्जुनची भूमिका साकारली होती. ज्याचं बरंच कौतुक झालं होतं. तो शेवटचा ‘पवित्र रिश्ता’मध्ये मानवची भूमिका साकारताना दिसला होता. आगामी काळात तो या मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shaheer sheikh shahnawaz sheikh passes away due to covid 19 infection mrj