बॉलिवूड कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांनाच असते. त्यातही आवडत्या कलाकाराच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यामध्ये चाहत्यांना भलतेच कुतूहल पाहायला मिळतं. त्यांची संपूर्ण दिनचर्या जाणून घेण्यासाठी ते कमालीचे उत्सुक असतात. अशा या स्टार कलाकारांमधील आवडीची जोडी म्हणजे शाहिद कपूर आणि मीरा राजपूत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच शाहिद पत्नी मीरा आणि मुलगी मिशासोबत विमानतळावर दिसला. शाहिदला दिवसातला जास्तीत जास्त वेळ मिशासोबत घालवायचा असतो. पण कामाच्या वेळामुळे ते प्रत्येकवेळी शक्य होतंच असं नाही. आपल्या मुलीला खूप दिवसांनी भेटल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. पांढरा टॉप आणि पँट घातलेली मिशा खूपच गोंडस दिसत होती. हेअरबँडमुळे तिचा संपूर्ण लूकच फार सुंदर दिसत होता. येत्या महिन्याभरातच मिशाचा पहिला वाढदिवस असून, ती आता वर्षाची होणार आहे.

मीरा राजपूत, मिशासोबत विमानतळावर शाहिदला भेटण्यासाठी आली असता छायाचित्रकारांनी तिचे काही फोटो टिपले. गाडीत बसल्यानंतर शाहिदने मिशाला आपल्या जवळ घेतले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूप काही सांगून जाणारे होते.

सध्या शाहिद, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यासोबत तो स्क्रिन शेअर करणार आहे. या सिनेमात रणवीर अलाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत दिसणार असून, शाहिद राणी पद्मिनीच्या पतीची म्हणजे रावल रतन सिंगची भूमिका साकारणार आहे. याचवर्षी शाहिद विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ सिनेमात दिसला होता.

‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत शाहिद म्हणाला की, ‘सध्या मी ‘पद्मावती’ सिनेमावरच संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. त्यानंतर माझ्याकडे कोणताही सिनेमा नाही. पण याबाबत चिंता करण्याचे कारण नसून जेव्हा तुम्ही चांगल्या भूमिकांवर काम करत नसता तेव्हा खरी चिंता करण्याची गरज असते.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoors happy reunion with his daughter misha will melt your hearts see photos
First published on: 26-07-2017 at 18:47 IST