बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बीचवरच्या आईसोबतच्या फोटोंची चर्चा होते तर कधी लग्न- कार्यात घालून आलेल्या ड्रेसची. आताही सुहानाचा स्विमिंग करतानाचा बिकिनीमधील एक फोटो कमालिचा व्हायरल होत आहे. स्टार किडमध्ये सर्वाधिक चर्चा होणाऱ्या मुलांच्या यादीत सुहाना नेहमीच वरच्या स्थानी असते. या फोटोत सुहाना तिच्या मैत्रिणीसोबत स्विमिंग पुलमध्ये निवांत क्षण घालवताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर सुहानाच्या फॅन क्लबमध्ये हा फोटो शेअर करण्यात आला. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये ती मैत्रिणीसोबत वेगवेगळ्या पोझ देताना दिसते. फोटोव्यतिरिक्त त्यांचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

https://www.instagram.com/p/BgzAN9WF4RQ/

सुहानाने बिकिनी घालण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही सुहाना बीचवर अब्रामसोबत तर आई गौरीसोबत ती बिकिनीमध्ये दिसली होती. सुहाना तिच्या बिकिनी लूकसाठी प्रसिद्ध आहे तेवढीच ती तिच्या मैत्रिणींसोबतच्या मजा- मस्तीसाठीही प्रसिद्ध आहे. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूरसोबतचे सुहानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

https://www.instagram.com/p/BgzAFc9lYZ7/

गेल्या काही दिवसांपासून सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार असे म्हटले जात होते. रिपोर्टनुसार, सुहानाने तिचे पहिले फोटोशूट केले आहे. एका मासिकासाठी तिने हे फोटोशूट केले असे खुद्द गौरीनेच सांगितले. पण सुहाना नक्की कोणत्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार हे मात्र अजून कळले नाही.

https://www.instagram.com/p/BgygCOYnldQ/