कोलकाता पोलिसांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शाहरुख खाने उपस्थिती लावली होती. प्रेक्षकांचे मनोरंजन कसे करावे हे शाहरुखला चांगलेच माहित आहे. मात्र, यावेळचा त्याचा मनोरंजनाचा अंदाज बहुतेक काहींना आवडला नाही असे वाटते.

सदर कार्यक्रमात आपल्या नेहमीच्या अंदाजात मनोरंजन करत असताना शाहरुखने पोलिसांच्या वर्दीत असलेल्या महिला पोलिसासोबत नृत्य केले तसेच, तिला उचलूनही घेतले. त्यामुळे शाहरुख आता वादाच्या भोव-यात सापडला आहे. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील उपस्थित होत्या. महिला पोलिसांना वर्दीत असताना नृत्य करण्याची परवानगी कशी दिली जाऊ शकते? असा प्रश्न भाजप नेता रितेश तिवारी यांनी केला आहे. यावर कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त निरुपम सोम म्हणाले की, पोलिसाच्या वर्दीचे पावित्र्य राखत मी माझ्या कार्यकाळात कोणत्याच पोलीस अधिका-यास नृत्य करण्याची परवानगी दिली नसती. सर्वसाधारण पोशाखात नृत्य करण्यास माझी काहीच हरकत नाही. वरिष्ठांनी वर्दीत नाचण्याची परवानगी कशी दिली याचे मलाही आश्चर्य वाटतेयं.

शाहरुखचा मनोरंजनाचा अंदाच त्याला महागात पडला आहे असे म्हणावयास हवे.