‘शक्ति’ फेम अभिनेता अनिरुद्ध दवेची करोनामुळे तब्येत बिघडली, ICUमध्ये दाखल

भोपाळमध्ये चित्रीकरण करत असताना त्याला करोनाचा संसर्ग झाला.

aniruddh dave,

‘शक्ति – अस्तित्व के एहसास की’ मालिकेत काम करणारा अभिनेता अनिरुद्ध दवेची गेल्या आठवड्यात करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. पण आता त्याची तब्येत बिघडली असून त्याला आयसीयू वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे.

भोपाळमध्ये एका वेब सीरिजचे चित्रीकरण सुरु असताना अनिरुद्धला करोनाचा संसर्ग झाला. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. पण अनिरुद्धची तब्येत बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आणखी वाचा : ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना ICUमध्ये हलवले

 

View this post on Instagram

 

A post shared by ANIRUDH V DAVE (@aniruddh_dave)

अनिरुद्धच्या जवळचा मित्र अजय सिंह चौधरीने याबाबत माहिती दिली आहे. ‘अनिरुद्ध जेव्हा वेब सीरिजचे चित्रीकरण करत होता तेव्हा त्याला करोना झाला. त्याने मुंबईत परत येण्याऐवजी भोपालमधील रुग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय घेतला. पण नुकताच समोर आलेल्या रिपोर्टनुसार त्याला जास्त इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे त्याला आयसीयू वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे’ असे अजय सिंह म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ANIRUDH V DAVE (@aniruddh_dave)

करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अनिरुद्धने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी तो म्हणाला ‘मी स्वत:ला एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करुन घेतले आहे. तसेच सर्वांनी काळजी घ्या.’ तसेच अनिरुद्धने सोशल मीडियावर देखील पोस्ट शेअर करत करोना झाल्याची माहिती गेल्या आठवड्यात दिली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shakti fame aniruddh dave tested corona positive and shifted to icu after avb