टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिझान खानला अटक करण्यात आली आहे. अभिनेता शिझान खानची बहीण फलक नाझ हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिझान खानच्या आईने याबद्दल पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. याबरोबर त्यांनी आमचा गुन्हा काय? आम्हाला कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळत आहे? असे प्रश्नही उपस्थित केले आहेत.

शिझान खानची आई कहकशां यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्यांची मुलगी फलक नाज बेडवर झोपल्याचे पाहायला ‘मिळत आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘संयम’ असे लिहिले आहे. त्याबरोबर त्यांनी हात जोडल्याचा एक इमोजीही शेअर केला आहे.
आणखी वाचा : तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर चर्चेत आलेला शिझान खान नेमका आहे तरी कोण? जाणून घ्या

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
Jitendra-Awhad
“निवृत्त न्यायाधीशांनाही कळू लागले आहे की…”, ‘त्या’ पत्रावरून जितेंद्र आव्हाडांची टीका
Shrikant Shinde, Sanjay Raut, Shrikant Shinde news,
श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
falak naaz

त्याबरोबर त्यांनी एक मोठी पोस्ट शेअर करत विविध प्रश्नही उपस्थित केले आहे. यात त्या म्हणाल्या, “आमच्या कुटुंबाला का आणि कोणत्या कारणासाठी शिक्षा होत आहे, हेच मला समजत नाही. माझा मुलगा गेल्या महिन्याभरापासून कोणत्याही पुराव्याशिवाय एखाद्या कैद्यांप्रमाणे तुरुंगात शिक्षा भोगत आहे. माझी मुलगी फलक हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.”

“तसेच शिझानचा लहान भाऊ ऑटिज्‍मने या आजाराने ग्रस्त असून त्यालाही त्रास होत आहे. आई म्हणून दुसऱ्याच्या मुलावर प्रेम करणे हा गुन्हा आहे का? की हे बेकायदेशीर आहे?? फलकने तुनिषावर एखाद्या लहान बहिणीप्रमाणे प्रेम केले हा गुन्हा होता की ते बेकायदेशीर होतं? शिझान आणि तुनिषा यांनी त्यांच्या नात्याला ब्रेक देणं किंवा ब्रेकअप करणं हा गुन्हा होता की ते बेकायदेशीर होते? ब्रेकअप करणं गुन्हा होता का किंवा बेकायदेशीर होतं का? आम्हाला त्या मुलीवर प्रेम करण्याचा, तिच्यावर माया करण्याचा अधिकार नव्हता का? आम्ही मुस्लीम आहोत म्हणून? आमचा गुन्हा काय?” असा प्रश्नही शिझानच्या आईने विचारला आहे.

falak naaz 1

आणखी वाचा : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण: शिझानच्या मेकअप रुममध्ये सापडली चिठ्ठी, त्यावर लिहिलंय…

या महिन्याच्या सुरुवातीला पालघर न्यायालयाने शिझान खानचा जामीन अर्ज फेटाळला होता. अभिनेत्री तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन २५ डिसेंबरला अटक करण्यात आली होती. शिझान हा न्यायालयीन कोठडीत तुरुंगात आहे.

तुनिषाने २४ डिसेंबरला मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. २७ डिसेंबरला तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाने अनेक मालिका व चित्रपटांमध्येही काम केलं आहे.