‘मला खात्री आहे तुम्हाला यातून चांगला धडा मिळाला असेल’, शेखर सुमनने केले शाहरुखसाठी ट्वीट

शेखर सुमनचे ट्वीट सध्या चर्चेत आहे.

मुंबई ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तब्बल २६ दिवसांनंतर तुरुंगातून आज बाहेर आला आहे. न्यायालयातून जामीन मिळूनही कारागृह प्रशासनापर्यंत कागदपत्रे वेळेत न पोहोचल्याने आर्यन खानला आणखी एक रात्र मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात काढावी लागली. मात्र, शनिवारी तो तुरुंगातून बाहेर आला. न्यायालयाचा आदेश प्राप्त करण्यासाठी आर्थर रोड कारागृहातील बेल बॉक्स आज पहाटे ५.३० वाजता उघडण्यात आला. दरम्यान, बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी ट्वीट करत आर्यन खानला पाठिंबा दिला. पण शेखर सुमनच्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शेखर सुमनने त्याच्या ट्वीटच्या माध्यामातून फिल्म इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे. ‘शाहरुख आणि गौरीला पालक म्हणून आता खूप बरं वाटत असेल. कोणतीही चूक नसताना त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. आर्यनला जामीन मिळाल्याबद्दल तुमचे अभिनंदन. मला खात्री आहे तुम्हाला यातून चांगला धडा मिळाला असेल’ या आशयाचे ट्वीट केले आहे.

दरम्यान, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानचा जामीन मंजूर केला होता. शाहरुखची मैत्रीण आणि अभिनेत्री जुही चावला शुक्रवारी संध्याकाळी २३ वर्षीय आर्यनच्या जामिनासाठी ड्रग्जशी संबंधित खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस कोर्टात हजर झाली. हायकोर्टाने शुक्रवारी आपल्या आदेशाचा मुख्य भाग उपलब्ध करून दिला ज्यामध्ये आर्यन खान आणि या प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यावर १४ अटी घालण्यात आल्या आहेत. तिघांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जामीनदारावर आणि तत्सम रकमेच्या दोन जामिनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shekhar suman congrats shahrukh khan on aryan bail avb

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या