बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा विवाहसोहळा १९ फेब्रुवारी रोजी पार पडला आहे. खंडाळा येथील फार्म हाऊसवर मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. मागच्या बऱ्याच काळापासून या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा होती. फरहान आणि शिबानी यांच्या लग्नाचे फोटो समोर आले असून त्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात लग्नानंतर शिबानीने सोशल मीडियावर तिचे नाव बदलले आहे.

शिबानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा बदल केला आहे. शिबानीचे लग्नाआधी शिबानी दांडेकर असे नाव होते. तर आता शिबानीने त्याला बदलत ‘शिबानी दांडेकर अख्तर’ असे केले आहे. तर तिने तिच्या बायोमध्ये आणखी एक बदल केला आहे. तो म्हणजे, ‘निर्माती, प्रेझेंटर, अभिनेत्री, गायिका आणि सौ. अख्तर’ असे केले आहे.

Muralidhar Mohol, Mahayuti meeting,
पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार
pune special court to pronounce verdict in narendra dabholkar murder case on may 10
दाभोलकर हत्या खटल्याचा निकाल १० मे रोजी; सीबीआय, बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Dr Anand Deshpande talk about How to take the industry forward
उद्योगाला पुढे कसे न्यावे? जाणून घ्या पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे यांचा गुरुमंत्र…

आणखी वाचा : ‘हा’ लोकप्रिय अभिनेता साकारणार ‘शक्तिमान’ ही भूमिका

आणखी वाचा : “कामवाली बाई”, मलायकाचा जीम लूक पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

दरम्यान, शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नासाठी शिबानीनं लाल रंगाचा वेडिंग गाऊन परिधान केला होता. ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. तर फरहान अख्तरने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. दोघांनीही अत्यंत साध्या पद्धतीनं आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. हे लग्न जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या खंडाळा स्थीत फार्महाऊसवर पार पडलं.

आणखी वाचा : “साडीतून दिसणाऱ्या या कमनीय बांध्याच्या…” अभिनेत्री उर्मिला निंबाळकरची पोस्ट चर्चेत

फरहान अख्तर आणि शिबानी यांचं लग्न सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. कारण या लग्नात दोघांनीही हिंदू रिवाजानुसार सप्तपदी घेतली नाही किंवा मुस्लीम रिवाजानुसार निकाह केला नाही. शिबानी आणि फरहाननं Vow ( शपथ किंवा वचन) आणि रिंग सेरेमनी करत एकमेकांनासोबत जीवन व्यतित करण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या या हटके लग्नाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. याआधी फेब्रुवारीच्या सुरुवातीला दोघांनीही रजिस्टर मॅरेज केलं होतं.