छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘सुपर डान्सर ४.’ या शोमधील स्पर्धकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नुकताच शोमध्ये अभिनेता सुनील शेट्टीने हजेरी लावली. दरम्यान शोची परिक्षक अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि सुनील शेट्टीने त्यांचा हिट चित्रपट ‘धडकन’मधील एक सीन रिक्रिएट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

९०च्या दशकातील सुपरहिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘धडकन.’ या चित्रपटात शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. आता ‘सुपर डान्सर ४’ या शोमध्ये सुनील शेट्टीने हजेरी लावताच चित्रपटातील एक सीन रिक्रिएट केला आहे.

आणखी वाचा : जेठालालच्या ‘गडा इलेक्ट्रॉनिक्स’ दुकानाचा कोण आहे मालक? जाणून घ्या

धडकन चित्रपटातील सुनील शेट्टीचा ‘तुम मुझे भूल जाओ ये मै होने नही दुंगा’ हा डायलॉग हिट ठरला होता. आता शिल्पा आणि सुनीलने सुपर डान्सर शोमध्ये हाच सीन रिक्रिएट केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

‘सुपर डान्सर ४’ या शोमध्ये गीता कपूर, अनुराग बासू आणि शिल्पा शेट्टी परिक्षक म्हणून दिसत आहेत. शोच्या आगामी भागामध्ये शिल्पा आणि सुनीलची मजामस्ती पाहायला मिळणार आहे. दरम्यान ‘धडकन’ चित्रपटातील गाण्यावर एकत्र डान्स करणार आहे. हा खास एपिसोड येत्या विकेण्डला प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa shetty and suneil shetty recreate the iconic scene from dhadkan on super dancer 4 avb
First published on: 28-05-2021 at 15:22 IST