पहिल्या पत्नीच्या अफेअर विषयी बोलायला नको होते; राज कुंद्रावर शिल्पा नाराज

राजने नुकताच एका मुलाखतीमध्ये पूर्वाश्रमीच्या पत्नीला घटस्फोट देण्यामागचे कारण सांगितले आहे.

shilpa shetty,raj kundra,raj kundra interview,raj kundra ex wife,kavita kundra,
राजने घटस्फोट घेण्याचा निर्णय का घेतला हे सांगितले आहे.

सध्या बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा चर्चेत आहे. या चर्चा राजने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पूर्वाश्रमीची पत्नी कविता विषयी वक्तव्य केल्यामुळे सुरु झाल्या होत्या. कविताला घटस्फोट का दिला यामागचे कारण देखील राजने सांगितले होते. पण यामुळे शिल्पा नाराज झाल्याचे राजने सांगितले.

राजने ‘पिंकव्हिला’ला नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने पूर्वाश्रमीची पत्नी कविताचे मेहुण्यासोबत अफेअर असल्यामुळे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता असा खुलासा केला होता. तसेच राजने या प्रकरणावर काही बोलू नये असे शिल्पाला वाटत असल्याचे देखील त्याने सांगितले होते.

आणखी वाचा : कपूर कुटुंबीयांनी आईकडे पाठ फिरवली होती, करीना कपूरचा खुलासा

‘कविताची जुनी मुलाखत व्हायरल झाल होती. या व्हिडीओमध्ये तिने शिल्पा शेट्टी आमच्या घटस्फोटाला कारणीभूत असल्याचे म्हटले होते. जेव्हा त्या व्हिडीओवर आधारित एक जुने आर्टिकल व्हायरल झाले तेव्हा मी ते शिल्पाला दाखवले. शिल्पाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी हे व्हायरल झाल्यामुळे मला वाईट वाटले’ असे राज म्हणाला.

पुढे तो म्हणाला, ‘शिल्पाला देखील वाईट वाटले होते. त्यामुळे माझी चिडचिड सुरु झाली. यावर मी खर काय आहे सर्वांसमोर आणण्याचा निर्णय घेतला. मी पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या अफेअर विषयी बोलायला नको होते अशी शिल्पाची इच्छा होती. ‘

काय म्हणाला होता राज?

“आम्ही सगळे माझ्या आई-वडिलांसोबत एकाच घरात राहत होतो. आमच्यासोबत माझी बहीण आणि मेहूणादेखील राहत होता. कारण इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याचा ते प्रयत्न करत होते. कविता माझ्या मेहूण्यासोबत अधिक वेळ व्यथित करू लागली होती. विशेषतः जेव्हा मी बिजनेस ट्रिपसाठी बाहेर जायचो तेव्हा माझ्या कुटुंबातील अनेकांनी त्यांना एकत्र फिरताना पाहिले होते. इतकच नव्हे तर माझ्या ड्रायव्हरने देखील त्या दोघांमध्ये काही तरी सुरु आहे असे मला सांगितले. मात्र, मी यावर कधीच विश्वास ठेवला नाही, मी माझ्या पूर्वाश्रमीच्या पत्नीवर कधीच संशय घेतला नाही,” असे राज म्हणाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shilpa shetty is upset after raj kundra spoke about ex wife in interview avb