पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा पहिल्यांदाच आले एकत्र; कोर्टात ठोकला ५० कोटींचा दावा

या अभिनेत्री विरोधात केला मानहानीचा दावा

raj kundra, sherlyn chopra shilpa shetty, shilpa shetty raj kundra file defamation case against sherlyn chopra, raj kundra pron racket, raj kundra controversy, sherlyn chopra controversy, sherlyn chopra 50 crore defamation case

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या चर्चा राज कुंद्राला पार्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यामुळे सुरु झाल्या होत्या. त्यानंतर शिल्पा आणि राज यांच्या नात्यामध्ये फूट पडली असल्याचे देखील म्हटले जात होते. पण आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे एकत्र आले असून त्यांनी अभिनेत्री शर्लिन चोप्रा विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे.

काही दिवसांपूर्वी शर्लिन चोप्राने राज कुंद्रावर गंभीर आरोप केले होते. राजने फसवणूक केली असून शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता राज आणि शिल्पाने शर्लिन विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच नुकसान भरपाई म्हणून ५० कोटी रुपयांची मागणी केला आहे.

काय होते शर्लिनचे आरोप?
पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शर्लिनने सोशल मीडिया पोस्टद्वारे अनेक आरोप केले होते. राज कुंद्राने फसवणूक केली असून शारीरिक शोषण केल्याचा आरोप शर्लिनने केला होता. एप्रिल २०२१मध्ये देखील शर्लिनने राज विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. राज कुंद्रा प्रकरणामध्ये क्राइम ब्रांचने शर्लिनची चौकशी केली होती. या प्रकरणातील ती महत्त्वाची साक्षीदार असल्याचे म्हटले जात होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shilpa shetty raj kundra slap sherlyn chopra with rs 50 crore defamation case avb