कंगनाच्या वक्तव्यावर नीलम गोऱ्हे संतापल्या; म्हणाल्या, “मी राष्ट्रपतींना…”

एका वक्तव्यामुळे कंगना पुन्हा एकदा वादात सापडली असून तिच्यावर सोशल मीडियावरून जोरदार टीका केली जात आहे.

nilam gorhe
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे कंगना पुन्हा एकदा वादात सापडली असून तिच्यावर सोशल मीडियावरून जोरदार टीका केली जात आहे. देशाला मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती खरं स्वातंत्र्य तर २०१४ सालामध्ये मिळालं आहे या कंगनाच्या वक्तव्यार बॉलिवूड सेलिब्रिटीसंह अनेक नेत्यांनी देखील निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी देखील कंगनावर टीका केली आहे. 

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “कंगना रनौतला नुकताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कार प्रदान केला आहे. त्यानंतर तिने आज बेजबाबदार, निराधार आणि स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणार वक्तव्य केल आहे. या वक्तव्याचा मी मी निषेध करते. कंगना रनौतने १९४७ च्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या योद्ध्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे मी राष्ट्रपतींना विनंती करणार आहे की, तिचा पद्म पुरस्कार ताबडतोब रद्द करावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.”

“वेडेपणा की देशद्रोह?”; कंगना रणौतच्या वादग्रस्त वक्तव्यावर वरूण गांधींचा सवाल

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील राणावतच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. कंगना हिला बेताल वक्तव्य करण्याची सवय आहे. तिच्या या वक्तव्याचा शिवसेनेतर्फे आम्ही निषेध व्यक्त करतो असं खासदार शिंदे यांनी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shiv sena leader neelam gorhe got angry over kangana ranaut statement srk

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या