अभिनेत्री श्रिया सरनच्या ‘दृश्यम’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन तब्बल दोन वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसला होता. श्रियाने बॉलिवूडमध्ये भलेही कमी चित्रपटांमध्ये काम केलं असेल पण दाक्षिणात्य चित्रटपसृष्टीत तिचे नाव आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये घेतले जाते. रजनीकांत यांच्या २००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिवाजी’ चित्रपटामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली.

रजनीकांत आणि श्रियाचा ‘शिवाजी’ चित्रपट तेव्हा हिट झाला होता. या चित्रपटात ती आपल्यापेक्षा दुप्पट वय असलेल्या रजनीकांत यांच्यासोबत रोमान्स करताना दिसलेली. या चित्रपटाच्या एका मोठ्या कार्यक्रमात श्रियाने शॉर्ट ड्रेस घातला होता. तिच्या या ड्रेसची राजकीय नेत्यांनी बरीच निंदा केलेली. तसेच, तिच्या कपड्यांवर प्रश्नचिन्हही उभारण्यात आलेले. त्यावेळी या कार्यक्रमाला तेव्हाचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम करुणानिधी हेदेखील उपस्थित होते. तेव्हा पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमधील श्रियाने त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे तेव्हा बराच गोंधळ झाला होता. या घटनेनंतर श्रियावर मुख्यमंत्र्यांची माफी मागण्याची वेळ आली.

वाचा : मृत्यूची चाहूल लागलेल्या इंदर कुमारने शेवटच्या मेसेजमध्ये लिहिलेले की..

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या श्रियाचा जन्म देहरादूनमध्ये झालेला. तिचे बालपण हरिद्वार येथे गेले. बालपणापासूनच नृत्याची आवड असलेल्या श्रियाला तिच्या मास्तरजींनी एका व्हिडिओमध्ये काम करण्याची संधी दिली आणि तिला चित्रपटांच्या ऑफर्स येण्यास सुरुवात झाली. ‘इष्टम’ या चित्रपटाने तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेले.

वाचा : स्वप्नील जोशीच्या गाण्याचं बॉलिवूडकरांना याड लागलं! व्हिडिओ व्हायरल

रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून श्रियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात तिने अगदी छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ‘थोडा तुम बदलो थोडा हम’ आणि ‘शुक्रिया’ मध्ये काम केले. या चित्रपटांनंतरही श्रियाला बॉलिवूडमध्ये हवेतसे यश मिळाले नाही. त्यामुळे तिने दाक्षिणात्य चित्रपटांवरच लक्ष केंद्रित करायचे ठरवले. त्यानंतर तिने २००७ साली ‘आवारापन’ने हिंदी चित्रपटसृष्टीत पुनर्पदार्पण केले. यात तिने इमरान हाशमीच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती.