एखाद्या कलाकारासाठी त्याचा अभिनय आणि त्याची एखादी भूमिका हिच त्याची ओळख बनते. मालिका विश्वातील असचं एक गाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते शिवाजी साटम. शिवाजी साटम यांनी आजवर अनेक मराठी आणि हिंदी मालिका तसचं सिनेमांमधून प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. त्याचसोबत रंगभूमीवरील अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. मात्र प्रेक्षकांच्या मनात घरं केलं ते त्यांच्या सीआयडी या शोमधील एसीपी प्रद्युमन या भूमिकेने. पण आता त्यांना काम मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवाजी साटम यांनी नुकतीच हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली होती. यावेळी शिवाजी साटम यांनी त्यांना आता कामाच्या ऑफर्स मिळत नसल्याचे सांगितले आहे. “मला असं नाही म्हणायचं मला ऑफर्स मिळत नाहीत. आज माझ्याकडे एक-दोन ऑफर्स आहे. पण देखील हवे तसं नाहीत. मी मराठी रंगमंचावर काम केलं आहे. मला दमदार भूमिका करायला आवडतात…”,असे शिवाजी म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “हे माझं दुर्दैव आहे, की आता तसं लिखाण होत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूचं नुकसान आहे. एक अभिनेता म्हणून मला चांगल्या कामाची उणीव भासत आहे. तर दुसरीकडे प्रेक्षकांना चांगल्या कलाकारांची उणीव भासत आहे.”

आणखी वाचा : मन्नतमध्ये घुसून ‘तो’ स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत होता, शाहरुख आला तर म्हणाला, “मला फक्त…”

पुढे शिवाजी त्यांना मिळणाऱ्या ऑफर्स विषयी म्हणाले, मला पोलिसांच्या भूमिका मिळतात. मी का करू? मी तिच ती भूमिका परत करू शकत नाही. पुढे त्यांना सीआयडीमधली एसीपी प्रद्युमनची भूमिका साकारायला आवडेल का? त्यावर ते म्हणाले उद्या जर सीआयडी सुरु होणार असेल. तर मी सगळ्यात पुढे असेल. मला ती भूमिका साकारण्याचा कंटाळ आलेला नाही, पण घरी राहण्याच नक्कीच कंटाळ आला आहे.

आणखी वाचा : “हत्ती खूप झाले आहेत आता माहूत पाठव…’, संदीप देशपांडेंनी सांगितला राज साहेबांचा ‘तो’ मजेदार किस्सा

शिवाजी साटम यांनी १९८८ साली नसीरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांच्या ‘पेस्टोनजी’ चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. ‘यशवंत’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘युगपुरुषस हु तु तु’, ‘दाग, सूर्यवंशम’, चायना गेट’, ‘पुकार’, ‘नायक’, ‘जोडी नंबर 1’, ‘बर्दाश्त’, ‘गर्व’ आणि ‘जिस देश में गंगा रहता है’ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. शिवाजी हसीन दिलरूबा या चित्रपटात शेवटी दिसले होते. पण यात त्यांची छोटी भूमिका होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivaji satam revels he is not getting work opportunities other than police officer role dcp
First published on: 19-01-2022 at 12:35 IST