‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेली शिवानी सुर्वे आता पुन्हा एकदा घरात परतली आहे. स्पष्टवक्तेपणाने आपला मुद्दा मांडणे, घरामध्ये अनेक वेळा वाद घालणे आणि तेवढ्याच ताकदीने दिलेला टास्क पूर्ण करणे यासाठी शिवानी प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय होती. त्यामुळे तिचं घरातून बाहेर पडणं प्रेक्षकांना खटकलं होतं. आता जरी ती पुन्हा या खेळात सहभागी झाली असली तरी बिग बॉसने तिच्यासमोर एक अट ठेवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवानी घरात आल्यानंतर बिग बॉसने तिला कन्फेशन रुममध्ये बोलावून घेतलं. ‘या घरात तू सदस्य म्हणून नाही तर काही दिवसांसाठी पाहुणी म्हणून असशील. परंतु ही गोष्ट घरातील इतर सदस्यांना कळता कामा नये,’ असं म्हणत बिग बॉसने तिला सक्त ताकीद दिली आहे. त्यामुळे आता शिवानीचा घरात वावर कसा असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आणखी वाचा : गाडीच्या अपघातामुळे मिळाली पहिली मुख्य भूमिका; शक्ती कपूर यांनी सांगितला रंजक किस्सा 

तब्येतीच्या तक्रारींमुळे शिवानी बिग बॉसच्या घरातून बाहेर गेली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया.कॉम’शी बोलताना तब्येत ठीक झाल्यानंतर पुन्हा शो मध्ये जाण्याची तिची इच्छा आहे असे ती म्हणाली होती. पण आता शिवानीच्या परत येण्याने या कार्यक्रमाला वेगळंच वळण मिळेल, याची शक्यता नाकारता येत नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivani surve entered in bigg boss marathi house but on one condition ssv
First published on: 14-07-2019 at 11:17 IST