बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव लवकरच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. स्ट्री या आगामी सिनेमातून ही हटके जोडी सर्वांच्या भेटीला येणार आहे. जानेवारीपासून या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली होती. नुकतीच सिनेमाच्या टीमने चित्रीकरण संपल्याची छोटेखानी पार्टी केली होती. या पार्टीला स्ट्रीचे दिग्दर्शक अमर कौशलही उपस्थित होते.
https://www.instagram.com/p/Bi4p5oIhm3P/
मुंबईतील वांद्र येथे स्ट्रीच्या संपूर्ण टीमने दणक्यात पार्टी केली होती. या पार्टीमध्ये श्रद्धाने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. तर राजकुमार या पार्टीत कॅज्युअल अवतारात आला होता. राजकुमारने पार्टीमध्ये टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. सिनेमाचे निर्माते दिनेश विजन यांनी याआधी राबता सिनेमातील अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत काम केले आहे. त्यामुळे सुशांतही या पार्टीत एन्जॉय आला होता. सुशांतनेही या पार्टीमध्ये फार धम्माल केली.
.@ShraddhaKapoor dances with @itsSSR on Main Tera Boyfriend at the wrap up party of #Stree. pic.twitter.com/tBZek9VFYu
— Filmfare (@filmfare) May 17, 2018
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांनी एकत्रित खूप सारे फोटोदेखील काढले. या पार्टीत सर्वात जास्त चर्चा झाली ती राजकुमार आणि श्रद्धा यांच्या क्रेझी डान्सची. सध्या त्यांच्या डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. श्रद्धा आणि सुशांतनेही डान्स केला. यावेळी सुशांतने श्रद्धाला त्याच्या सिनेमातील ‘मैं तेरा बॉयफ्रेंड’ गाण्यावर ताल धरायला लावला. या व्हिडिओमध्ये हे तिघंही भान हरपून नाचताना आणि आनंद लूटताना दिसत आहेत.