सोनी मराठीवरील नुकतंच बोला जय भीम हा विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिंदेशाही घराण्याच्या पाचव्या पिढीने संगीत क्षेत्रात पदार्पण केले. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा नातू आल्हाद शिंदे याने या कार्यक्रमात एक गाणं सादर केले. या गाण्याच्या सादरीकरणानंतर आल्हादने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आनंद शिंदे यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श अशी तीन मुले आहेत. उत्कर्ष शिंदे आणि आदर्श शिंदे हे दोघेही संगीत क्षेत्रात नशीब आजमावताना दिसत आहेत. तर हर्षद शिंदे हा अॅनिमेशन इंजिनिअर आहे. हर्षद शिंदेचा मुलगा आल्हाद शिंदे याने नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात गाणे सादर केले. यानिमित्ताने शिंदे घराण्याची पाचवी पिढी म्हणून संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत असल्याचे पाहायला मिळाले. आल्हादने नुकतंच याबद्दल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर पुढे काय करणार? विशाखा सुभेदारने केला खुलासा

आल्हाद शिंदेची इन्स्टाग्राम पोस्ट

“दोन वर्षांनी परत तुम्हा सर्वांसमोर सादर झालो. खूप धमाल केली. खूप काही शिकायला मिळालं. आणि माझ्यासाठी एक चॅलेंजिंग गोष्ट ही होती की आज मला माझ्या आजोबांसमोर म्हणजेच आनंद शिंदे यांच्या समोर माझं गाणं, ”पुस्तक भिमाचं रमाईचं”गायचे होते. मग ते गाणं परफेक्ट होणे ह्याची जबाबदारी घेऊन माझे काका, उत्कर्ष शिंदे आणी आदर्श शिंदे ह्यांनी मला खूप मदत केली.”

“जरी आम्ही एक परिवार असलो, तरी त्या क्षणाला ते माझे गुरु होते आणी मी त्यांचा शिष्य होतो. ही माझ्यासाठी एक अवघड परीक्षा होती. जेव्हा माझं गाणं संपलं, जी पहिली गोष्ट मी पाहिली ती म्हणजे पपांचे डोळे भरुन आले होते. मला पपांनी सांगितले “मी तुला लहानपणापासून प्रल्हाद दादा बोलायचो. आजपासून तूच माझा प्रल्हाद दादा आहेस. ”हे आईकुन मला रडू आले. माझे काका आणी माझे आजोबा ह्यांनी भरभरून आशिर्वाद दिले. असच माझ्यावर आणी शिंदेशाही वर प्रेम करत राहा. धन्यवाद सोनी मराठी ही संधी दिल्याबद्दल”, असेही आल्हाद शिंदेने म्हटले आहे.

“चंद्राची भूमिका तुझ्यासाठी नेमकी काय?” अमृता खानविलकर म्हणते “ती फक्त लावणी…”

दरम्यान आल्हाद शिंदेने यासोबत मंचावरील काही फोटोही पोस्ट केले आहे. या फोटोत आल्हाद हा गाताना दिसत आहे. त्यासोबतच प्रल्हाद शिंदे आणि आनंद शिंदे दिसत आहे. त्याचा हा फोटो चांगला व्हायरल झाला आहे.

प्रल्हाद शिंदे यांनी अनेक गाणी गायली आहेत. त्याने भक्तीगीतं, भीमगीतं तसेच लोकगीते आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्यांचा संगीताचा हाच वारसा आनंद शिंदे आणि त्यांची नातवंडे पुढे चालवताना दिसत आहेत. आनंद शिंदे यांचे आजोबा भगवान शिंदे उत्कृष्ट पेटीवादक होते. तर त्यांची आजी सोनाबाई या तबलावादक होत्या. सदाशिव, नारायण आणि प्रल्हाद या तीन मुलांनी देखील संगीत क्षेत्राची सेवा केली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer anand shinde grandson aalhad shinde talk about the experience first musical debut nrp
First published on: 12-04-2022 at 18:33 IST