“पिझ्झा खाण्यापेक्षा भाकरी खा”, आशा भोसले यांचा महिलांसाठी कानमंत्र

मला त्यावेळी काही खाल्लं तर गाणी गाता येत नव्हते. मी चार- पाच गाणी दिवसातून गायचे.”

प्रसिद्ध गायिका आशा भोसले या अनेकदा काही ना काही कारणांमुळे चर्चेत आहे. आशा भोसले यांचा चिरतरुण आवाज आणि तेवढाच सळसळता उत्साह याने रसिक प्रेक्षकांना अनेक वर्ष भारावून टाकले आहे. आशा भोसले यांचा फार मोठा चाहता वर्ग आहे. नुकतंच मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान आशा भोसले यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी काही फिटनेस टिप्सही दिल्या आहेत.

मुंबईतील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आशा भोसले यांनी हजेरी लावली. यावेळी त्या म्हणाल्या, “मी बालपणी जास्त जाड नव्हते. पण फार गोड होती. त्यावेळी दीदी मला कडेवर घेऊन जायच्या. तिला मी फार आवडायची. पण त्यानंतर काही वर्षांनी मी जाड झाली आणि तो जाडपणा बरेच वर्ष राहिला. त्यावेळी उंचीच्या मानानं वजन जास्त झालं होतं. ते वजन कमी करण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले. मला त्यावेळी काही खाल्लं तर गाणी गाता येत नव्हते. मी चार- पाच गाणी दिवसातून गायचे.”

“पण मी वयाच्या ६० व्या वर्षापासून माझं वजन ६५ किलो ठेवलं आहे. आतापर्यंत ते तेवढंच आहे. मी जेव्हा अमेरिकेत होते तेव्हा मी काही बायका रडत असल्याचे पाहिले. मी सहजच पुढे जाऊन बघितलं तर तेव्हा मला त्यांच्या रडण्याचे कारण समजले. त्यांची मुलं ही फार जाड होती. त्यांना चालताही येत नव्हते.” असेही त्यांनी म्हटले.

“यानंतर मी तिथूनच तातडीने माझ्या सूनेला फोन केला आणि तिला सांगितलं की, माझ्या नातवाला पाकिटातील बंद काही खायला देऊ नको. त्याला फक्त घरातील वरण भात, पोळी दे. लहान मुलांचे सोडा आपण सर्वच जाड आहोत. सर्वांनी चालायला हवं. स्वत:साठी थोडा वेळ काढायला हवा”, असेही त्यांनी सांगितले.

“महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलं पाहिजे असं राज ठाकरेंनी मला सांगितलं होतं, पण…” : जॅकी श्रॉफ

“अनेक लहान मुलं तुमचं पाहून खायला शिकतात. जर तुम्ही त्याच्यासमोर पिझ्झा खाल्ला तर ती लहान मुलं देखील ते खाणार. तुम्ही भाकरी का खात नाही? माझी आई आम्हाला अनेकदा सांगायची पाच इंद्रियांना सांभाळण्यापेक्षा एका इंद्रियाला सांभाळा ते म्हणजे जीभ. तुमचं खाणं जितकं चांगलं असेल तितके तुम्ही सुंदर दिसाल”, असे त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Singer asha bhosle gives fitness tips for female on this generation during mumbai programme nrp

Next Story
रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस लूक, ‘झुंड’नंतर आणखी एका नव्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी