‘दांडिया क्वीन’ अशी ओळख असणारी फाल्गुनी पाठक सध्या सातत्याने चर्चेत आहे. नवरात्रोत्सव आणि फाल्गुनी पाठक हे एक अनोखे नाते आहे. फाल्गुनी पाठक यांच्या गाण्याशिवाय नवरात्र हा सण अपूर्ण असल्याचे बोललं जातं. यंदा दोन वर्षानंतर सर्वत्र मोठ्या थाटात नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवाबरोबर फाल्गुनी पाठक या अभिनेत्री नेहा कक्करसोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आहे. नेहाने ९० च्या दशकातील प्रसिद्ध गाणे ‘मैने पायल है छनकाई’चा रिमेक केल्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. नुकतंच यावर फाल्गुनी पाठकने प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूड गायिका नेहा कक्कर ही तिच्या गाण्यांसाठी कायमच लोकप्रिय असते. ती दररोज नवीन गाणी प्रेक्षकांसमोर सादर करत असते. नुकतेच नेहाचे एक नवीन गाणे रिलीज झाले आहे. नेहाने ९० च्या दशकातील प्रसिद्ध गाणे ‘मैने पायल है छनकाई’चा रिमेक केला आहे. यामुळे ती सातत्याने चर्चेत आहे. अनेकांनी या गाण्यानंतर नेहाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी तिचे हे नवीन गाणे अजिबात आवडलेले नाही, अशी कमेंट करताना दिसत आहे. नुकतंच फाल्गुनी पाठक यांनी नवभारत टाइम्सला एक मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यांनी गाण्यांचे रिमिक्स करण्याबद्दल त्यांचे मत मांडले.
आणखी वाचा : नवरात्रीचे नऊ रंग नेमके कसे ठरवले जातात? जाणून घ्या यामागे दडलेले गुपित

‘मैने पायल है छनकाई’ हे तुमचे सुपरहिट गाणे रिक्रिएट केल्यामुळे गायिका नेहा कक्कर ट्रोल झाली आहे. नेहा त्यांच्या गोड आठवणी खराब करत आहे, अशी प्रतिक्रिया तुमच्या चाहत्यांकडून व्यक्त होत आहे, याबद्दल काय सांगाल, असा प्रश्न फाल्गुनी पाठकला विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या, “नेहाने असे करायला नको होते. हे गाणे लोकांच्या हृदयाच्या जवळ आहे. त्यामुळे तिने या गाण्यासोबत छेडछाड करायला नको होती. तुम्ही गाण्यांची छेडछाड का करता? बाकी तुमच्यावर आहे. आपण याबद्दल काय बोलू शकतो?”

“एखादे गाणे रिमिक्स करणे याला मी चुकीचे मानत नाही. सर्व रिमिक्स वाईट नसतात, काही चांगलेही असतात. जर तरुणाईला रिमिक्सच्या माध्यमातून एखादे गाणे आधुनिक पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असेल तर त्यात चुकीचे काहीही नाही. पण त्याला काही तरी मर्यादा असावी. मी माझ्या गाण्यांमध्ये सभ्यतेची पूर्ण काळजी घेते. खालच्या दर्जाचे किंवा डबल मिनींग शब्दांचा वापर करत नाही”, असे फाल्गुनी पाठक यांनी सांगितले.

आणखी वाचा : “मला उलटी…” नेहा कक्करच्या ‘पायल है छनकाई’ रिमेकवर फाल्गुनी पाठकची पहिली प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान नेहा कक्करचे ‘ओ सजना’ हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे ९० च्या दशकातील ‘मैंने पायल है छनकाई या लोकप्रिय गाण्याचा रिमेक आहे. हे नवीन व्हर्जन बॉलिवूड रिमिक्ससाठी प्रसिद्ध असलेल्या तनिष्क बागचीने संगीतबद्ध केलं आहे. नेहासह क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि अभिनेता प्रियांक शर्मा देखील म्युझिक व्हिडीओमध्ये दिसले आहेत. पण यामुळे तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे.