‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या शोच्या माध्यमातून नावारुपाला आलेली गायिका म्हणून कार्तिकी गायकवाडला ओळखले जाते. आजवर अनेक गाण्यांना तिने आवाज दिला आहे. ती कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. कार्तिकी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने तिचा पती रोनित पिसेने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्याने त्याच्या पत्नीला खास पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रोनित पिसे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने कार्तिकीच्या वाढदिवसानिमित्ताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने कार्तिकीबरोबरचा एक गोड फोटो शेअर केला आहे. याला त्याने फारच हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “त्यांनी मित्राचा बुरखा पांघरला आणि…” घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने पहिल्यांदाच सोडलं मौन

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

“मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी कष्टाळू प्रेमळ आणि मनमिळावू बायको मिळाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”, असे त्याने यात म्हटले आहे.

दरम्यान कार्तिकी आणि रोनित यांचा लग्नसोहळा गेल्यावर्षी पार पडला होता. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वी कार्तिकी आणि रोनित थायलंडलाही गेले होते. त्यांच्या थायलंड ट्रीपची चर्चा सर्वत्र रंगली होती.

रोनित पिसे हा व्यावसायिक आहे. तो पुण्याचा राहणारा असून इंजिनीअर आहे. विशेष म्हणजे रोनितलाही संगीताची आवड आहे. तो उत्तम तबलावादक आहे. गायकवाड कुटुंब आळंदीत राहत असून कार्तिकी आपले वडील आणि गुरू कल्याणजी गायकवाड यांच्या संगीताचा वारसा चालवते.