प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी (३० मे) रात्री कोलकात्यामध्ये निधन झाले. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. वयाच्या ५३ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. काल रात्री १०.४५ मिनिटांनी त्याचे निधन झाले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूनंतर सर्वांनाचा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केके हा कोलकात्यामधील एका कॉलेजमध्ये नाझरुल मंचच्या कार्यक्रमात गाणे सादर करण्यासाठी गेला होता. मात्र त्याला अस्वस्थ वाटत होते. मंचावर गाणे गात असतानाच त्याला जास्त त्रास व्हायला लागला. यानंतर त्याने स्पॉटलाइट बंद करण्यास सांगितले. माझी तब्ब्येत ठीक नाही, मला फार गरम होत आहे. अस्वस्थ असल्याचे वाटत आहे, असे तो वारंवार सांगत होता.

“मला आमंत्रण का दिले नाही?”, प्रियांका चोप्राची ‘ती’ पोस्ट चर्चेत

त्यामुळे तो त्याच्या हॉटेल रुममध्ये परतला. यावेळी पायऱ्या चढत असताना अचानक तो पडला. यानंतर त्याला कोलकात्यामधील सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

या कॉन्सर्टमधील शेवटच्या काही मिनिटांमध्ये केकेने ‘कल हम रहे न रहें कल.. याद आऐंगे ये पल…’ गाणं गातच चाहत्यांचा निरोप घेतला. ‘यारों दोस्‍ती बड़ी ही हसीन है…’ हे गाणंही त्याने या कॉन्सर्टमध्ये गायलं होतं. केकेच्या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

तेजश्री प्रधान लवकरच करणार छोट्या पडद्यावर कमबॅक, म्हणाली “मी पुनरागमन करण्यासाठी…”

View this post on Instagram

A post shared by KK (@kk_live_now)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केके याने माचीस (छोड़ आये हम वो गल्ल्यां) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण केके ला खरी ओळख ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातून मिळाली. त्यात त्याने ‘तडप तडप के इस दिल से’ हे गाणे गायले होते. केके याचा जन्म २३ ऑगस्ट १९६८ रोजी दिल्लीत झाला होता. केके यांनी हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांमध्ये गाणी गायली होती.