महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांवरुन निशाणा साधला. जर मशिदीवर भोंगे वाजत असेल तर त्याच्या समोर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा लावा, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. यामुळे गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसा आणि मशिदीवरील भोंगे यावरुन राजकारण तापलं आहे. याप्रकरणी विविध प्रतिक्रिया उमटत असताना नुकतंच प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक शंकर महादेवन यांनी एक घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक शंकर महादेवन हे नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. ते नेहमी संगीतात विविध हटके प्रयोग करताना दिसतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी संगीत क्षेत्रात ‘ब्रेथलेस’ ही नवी संकल्पना आणली आणि ती फार हिट ठरली होती. यानंतर आता लवकरच शंकर महादेवन ‘ब्रेथलेस’ हनुमान चालिसा गाताना दिसणार आहेत. नुकतंच त्यांनी याबाबत घोषणा केली आहे.

“हे लोक जाणूनबुजून…”, ऑस्करसह ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात लता मंगेशकर यांना श्रद्धांजली न वाहिल्यानं कंगना रणौत संतप्त

https://www.kooapp.com/koo/shemaroobhakti/5db43b2a-a533-4c3b-a072-f360d4e8e894

शंकर महादेवन यांनी क्रु अॅपद्वारे याबाबतची घोषणा केली आहे. शेमारु भक्ती या अकाऊंटवरुन शंकर महादेवन यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत ते म्हणाले, ‘तुम्हाला सांगताना फार आनंद होतोय की मला लवकरच अद्भुत हनुमान चालिसा गाण्याची संधी मिळाली आहे. हे गाणं मी ब्रेथलेस स्टाईलमध्येच गाणार आहे.’

“या गाण्याचा गातानाचा वेग फार जास्त आहे. तसेच त्यातील काही शब्द हे कठीण आहे. हनुमान चालिसाचे आपल्या सर्वांच्या आयुष्यात विविध महत्त्व आहे. यामुळे आपल्याला चांगले फायदे मिळतात. त्यामुळे तुम्ही हे नक्की ऐका”, असे आवाहनही शंकर महादेवन यांनी केले आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीने KKR च्या क्रिकेटपटूला विचारले ‘तू कोण?’; चाहते म्हणाले “तो तुझ्यापेक्षा जास्त प्रसिद्ध…”

शंकर महादेवन यांची ब्रेथलेस हनुमान चालिसा शेमारु भक्ती के यु-ट्यूब चॅनलवर दाखवण्यात येणार आहे. ती नक्की कधी प्रदर्शित होईल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र लवकरच शंकर महादेवन यांनी गायलेली ब्रेथलेस हनुमान चालिसा लवकरच प्रदर्शित होईल, अशी चर्चा सुरु आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer shankar mahadevan big announcement will soon sing breathless hanuman chalisa nrp
First published on: 06-04-2022 at 13:05 IST