‘सिंघम रिटर्नस्’ या रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटाचा प्रोमो मुंबईत ११ जुलै रोजी एका कार्यक्रमाद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. रोहित शेट्टीसह चित्रपटातील प्रमुख जोडी अजय देवगण आणि करिना कपूर यांच्या हस्ते प्रोमोचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटातील हाणामारीची दृष्ये चित्तथरारक अशी आहेत. या चित्रपटाद्वारे रोहित शेट्टी निर्माता म्हणून सुद्धा पुढे येत आहे. अजय देवगण फिल्म्स आणि रिलायन्स एन्टरटेंमेन्टबरोबर रोहितदेखील चित्रपटाचा निर्माता आहे. अमोल गुप्ते चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत असून, त्याच्या कामाची वाखाणणी होत असल्याचे समजते.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jun 2014 रोजी प्रकाशित
‘सिंघम रिटर्नस्’ चा प्रोमो ११ जुलैला प्रदर्शित
'सिंघम रिटर्नस्' या रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटाचा प्रोमो मुंबईत ११ जुलै रोजी एका कार्यक्रमाद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
First published on: 30-06-2014 at 07:45 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodरोहित शेट्टीRohit Shettyहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singham returns promo to be launched on july